scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
bjp attacks congress over sam pitroda wealth distribution remark
भाजपच्या हाती पित्रोदांच्या‘वारसा करा’चे कोलीत; भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसची अडचण

पित्रोदांच्या भूमिकेपासून काँग्रेसने तातडीने फारकत घेतली तरी प्रचारसभांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसची कोंडी केली आहे.

no road toll for mulund society residents bjp candidate mihir kotecha claim
मुलुंडच्या हरिओम नगरमधील रहिवाशांना टोलमाफी? भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा दावा

सध्या हरी ओम नगरच्या रहिवाशांना एकूण पथकार दराच्या फक्त २५ टक्के रक्कम भरल्यानंतर मासिक पथकर पास मिळतो.

bjp virus hit ajit pawar says mla rohit pawar
भाजप हा एक व्हायरस आहे, आता तो व्हायरस अजितदादांना लागला : आमदार रोहित पवार

.पूर्वी दादा १०० टक्के खर बोलत असायचे, भाजपच्या प्रभावामुळे आता ५०/५० टक्क्यावर आले आहेत.

solapur, Rahul Gandhi, pm narendra modi, Rahul Gandhi Criticizes Modi, Favoritism Towards Industrialists, rahul gandhi in solapur, praniti shinde, solapur lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, solapur news, bjp, congress
लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी…

Congress leader Rahul Gandhi
10 Photos
शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा; म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली

Devendra Fadnavis, urge wardha people, urges vote for pm Modi, wardha lok sabha seat, lok sabha 2024, election campaign, wardha news, marathi news, pm narendra modi,
“असली पिक्चर अभी बाकी है,” देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

ही देशाची निवडणूक असून देशाचा नेता निवडायचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकासाची गाडी सुसाट निघाली आहे. ‘असली पिक्चर अभी…

garibi hatao, Congress announcements, Nitin Gadkari, nitin gadkari criticises congress, poor got poorer, buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election campaign, mahayuti, bjp, marathi news,
“काँग्रेसच्या घोषणेने गरिबी तर हटली नाही, गरीब आणखी गरीब झाले,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका; म्हणाले…

देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तिपासून तब्बल साठ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. मात्र यामुळे गरिबी तर हटली नाहीच, उलट…

akola lok sabha seat, bjp, voters upset, voting percentage fell, prakash ambedkar , prakash ambedkar criticises bjp, lok sabha 2024, election campaign, marathi news, akola news,
“भाजपमुळे भ्रमनिरास झाल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरली,” ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले, ‘‘संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच…”

२०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली, अशी टीका वंचित…

bacchu kadu on rana
11 Photos
Lok Sabha Election 2024 : मैदान प्रकरणाच्या राड्यानंतर अमरावतीमध्ये बच्चू कडूंची सभा; राणांवर जोरदार टीका!

अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात संघर्ष पेटला होता.

kerala caste politics loksabha
मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित

केरळमधील युतींच्या राजकारणात मतांचे गणित जातीय समीकरणावरच आधारित आहे. केरळमध्ये एझावा, मुस्लीम, ख्रिश्चन, नायर आणि दलित हे मुख्य समुदाय आहेत.

amravati lok sabha seat, Sharad Pawar, apologize to farmer s widows , amit shah criticizes Sharad Pawar, Home Minister Amit Shah, navneet rana, eknath shinde, devendra fadnavis, election campaign, lok sabha 2024, election news, amaravati news,
शरद पवारांनी आधी शेतकरी विधवांची माफी मागावी, गृहमंत्री अमित शाह यांची टीका

शरद पवार हे मुख्‍यमंत्री असताना देशाचे कृषीमंत्री असताना विदर्भासाठी त्‍यांनी काय केले. असा प्रश्न विचारत गृहमंत्री अमित शाह यांनी शरद…

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “ज्यांचा एकही व्यक्ती निवडून…”

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव…

संबंधित बातम्या