मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राज्यस्तरीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. राज ठाकरे हे या पक्षाचे प्रमुख आहेत. रेल्वे इंजिन हे या पक्षाचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्विकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाच्या केवळ एका उमेदवाराला बहुमत मिळाले. पुढे २०२० मध्ये या पक्षांने आपल्या नव्या विचारसरणीबाबतची घोषणा करत नवा झेंडा स्वीकारला.


Read More
Raj Thackeray Raju Patil
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा एक आमदार सर्वांचं गणित बिघडवणार? राजू पाटील कोणाला मत देणार?

राजू पाटील म्हणाले, राज ठाकरे हे सध्या अमेरिकेत असून विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.

Panvel, MNS Protests, mns Protests against Pothole on panvel Roads, potholes on panvel roads, panvel roads potholes, panvel news,
पनवेल : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांमधील खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आक्रमक होत पनवेल पालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोर आंदोलन केले.

Raj thackeray anil patil
“बरं झालं, आमदारांना रुळावरून चालत जावं लागलं”, मनसेची सरकारवर बोचरी टीका; म्हणाले, “महाराष्ट्राला…”

मुंबईत रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसामुळे शहरातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. तेव्हा एक्सप्रेसही खोळंबल्या होत्या.

Vasant More join Shiv Sena Uddhav Thackeray
‘इतर पक्षात सन्मान नाही’, वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंची मनसेवर टीका

मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेवर…

mns party workes protested after the water logged in chandivali
MNS Protest in Chandivali: “भ्रष्ट्राचार करो…”; टायरमध्ये बसून मनसैनिकांचं हटके आंदोलन

पहिल्याच पवासात मुंबई तुंबल्याने सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. याच साचलेल्या पाण्यामध्ये मनसेच्या काही…

Worli Hit and Run Case
“BMW चालकानं गाडी पळवली नसती तर…”, वरळीतील अपघातावर मनसेच्या संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया

Worli Hit and Run Accident : वरळीमध्ये आज सकाळी एका BMW वाहनानं कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील महिलेला…

Pramod Patil On Vasant More
“वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चात्ताप होईल”, राजू पाटलांचा टोला; म्हणाले, “आता फेसबुक लाईव्हचं नेतृत्व…”

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वसंत मोरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Vasant Mores entry into the Shivsena Uddhav Thackeray group
Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरेंनी घेतली ठाकरेंची भेट, विधानसभेची उमेदवारी मिळणार?

वसंत मोरे हे शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांची त्यांनी आज मातोश्री येथे भेट…

maharashtra navnirman kamgaar Sena,
मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर भरदुपारी गोळीबार, चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील घटना; जखमी अवस्थेत…

चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार…

Raj Thackeray Fatwa
“मुस्लीम समाजातील ‘त्या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”; मनसे नेत्याची मागणी!

पुढे बोलताना त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

Interview of Raj Thackeray conducted by Maharashtra Mandal in America
Raj Thackeray on Interview: अमेरिकेत महाराष्ट्र मंडळाकडून घेण्यात आलेली राज ठाकरेंची मुलाखत!

अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.…

raj thackeray devendra fadnavis (2)
मनसेचं महायुतीशी बिनसलं; विधान परिषदेला पाठिंबा नाही, संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीबरोबर नाही.

संबंधित बातम्या