scorecardresearch

आदित्य ठाकरे

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
Aditya Thackeray Thane Visit | Balkum Ring Metro Protest | Amazon Data Center Thane Controversy | Shiv Sena UBT Thane
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो, अ‍ॅमेझॉन डेटा सेंटरविरोधात ठाकरे मैदानात; आदित्य ठाकरे नागरिकांशी साधणार संवाद

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आदित्य ठाकरे बाळकुम येथे पोहोचणार असून, संबंधित प्रकल्पांबाबत कोणती भूमिका मांडतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

Shiv Sena Youth Politics
शिवसेनेच्या आंदोलनाचा प्रवास: भगव्याकडून तिरंग्याकडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या तरुणांना संघटित करून शिवसेना रुजवली, त्याच शिवसेनेच्या नव्या पिढीला आता तरुणांकडून नव्या आंदोलनाची भाषा शिकावी…

Aaditya Thackeray Mulund Sabha | Mihir Kotecha Resignation | Mulund Land Dispute BJP | Shiv Sena UBT Signature Campaign
स्थानिक आमदारांकडून मुलुंडकरांची फसवणूक; आदित्य ठाकरे यांचा आरोप मिहिर कोटेचा यांच्या राजीनाम्याची

मुलुंड पूर्व रेल्वे स्थानक परिसरात घेतलेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी कोटेचा यांच्या जुन्या वक्तव्यांचे व्हिडीओ दाखवत त्यांची पोलखोल केली.

Aaditya thackeray on VHP
मुस्लिमांना गरबा-दांडियात प्रवेशास मनाई करणाऱ्या विहिंपला आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, हिंदुंनी टिळा लावण्याच्या आवाहनावरही टीका!

Aaditya Thackeray on VHP : आदित्य ठाकरे यांनी विश्व हिंदू परिषदेवर टीका केली आहे. तसंच, जीडीपी वाढीवर मोदींनी केलेल्या आव्हानावरही…

Aditya Thackeray Marathwada White Paper news in marathi
मराठवाड्याच्या विकासप्रश्नी श्वेत पत्रिका काढावी; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मागणी

विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार या शीर्षकाखाली मराठवाडा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी सादरीकरण करण्यात आले.

Aditya Thackeray Nashik Visit | Pune Santosh Pandit Arrest | Vidyanand Bapat Attack | Maharashtra Political News
पुण्यात पंडितांना मध्यरात्री अटक, बापटांना मारहाण; आदित्य ठाकरे म्हणाले, ‘एनआयएला घरी पाठवणार का?’

सणोत्सवातील ध्वनिवर्धकावरील कारवाईबाबत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमदार ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Disha Salian Death Case CBI Inquiry | Aditya Thackeray Statement Disha Salian Case Nitesh Rane | दिशा सालियन सीबीआय चौकशी | आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरण नितेश राणे
दिशा सालियन प्रकरणाच्या सीबीआय चौकशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी ६ वर्षांपासून…”

Disha Salian Death Case CBI Inquiry: दिशा सालियन सीबीआय तपासावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया.

Aditya Thackeray Visit Tribal Students Protest
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन; दोन दिवसांपासून जेवण-पाण्याविना हाल, आदित्य ठाकरेंची भेट

आंदोलनस्थळी १०० हून अधिक विद्यार्थी असून तीन विद्यार्थी उपोषणास बसले आहेत. गुरूवारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी…

Aditya Thackeray Disha Salian Case Bombay High Court | Satish Salian Petition CBI Probe Disha Death | Nitesh Rane Narayan Rane Allegations Aditya Thackeray | Bombay High Court Reserved Order Disha Salian
दिशा सालियन मृत्यू प्रकरण :राजकीय हेतुने आपले नाव या प्रकरणी गोवले जात आहे,आदित्य ठाकरेंकडून उच्च न्यायालयात युक्तिवाद; दिशाच्या वडिलांच्या याचिकेवरील निकाल राखीव

राणे पिता-पुत्रांकडून राजकीय हेतूने आरोप; आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप अर्जाद्वारे दावा.

Aaditya Thackeray Mumbai Goa Highway Inspection | Aaditya Thackeray Chiplun Tour | Mumbai Goa National Highway Potholes | Shiv Sena UBT Kokan Visit
‘दहा वर्षांपासून फक्त गणेशोत्सवापूर्वी आश्वासने आणि डागडुजी’; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते. अशा परिस्थितीत महामार्गाचे काम पूर्ण…

Aditya Thackeray Mumbai Goa Highway Inspection | Alibaug News | Shiv Sena UBT leader Aditya Thackeray | Raigad Mangaon Indapur Traffic Issues | National Highways Authority of India NHAI Roads
सुपर हायवे उभारण्याच्या घोषणा करणारे आता एका लेनवर आलेत; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर आदित्य ठाकरेंची टीका

किमान माणगाव-इंदापूर परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख…

संबंधित बातम्या