scorecardresearch

About Photos

आम आदमी पार्टी Photos

आम आदमी पार्टी (AAP) हा भारत देशातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. हा पक्ष समाजसेवक अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापन केला. भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे या पक्षाचे मुख्य उद्देश आहेत.

अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) ह्यांच्यामधील मतभेदानंतर केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबर इ.स. २०१२, रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षाने दुसऱा क्रमांक पटकावला. पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २२,००० मतांनी पराभव केला.

२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
Read More
Mumbai Potholes Sarvapitri Amavasya Shradhha By AAP
6 Photos
PHOTOS: मुंबईच्या खड्ड्यांना मोक्षप्राप्ती मिळो! सर्वपित्री अमावास्येआधी आम आदमी पक्षाने रस्त्यात घातलं श्राद्ध

Mumbai Potholes: मुंबईच्या खड्ड्यांना मोक्षप्राप्ती मिळावी म्हणून आम आदमी पक्षाने BMC च्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध फलक झळकवले होते.

Narendra Modi Arvind Kejriwal
13 Photos
Photos : “८५०० कोटींचं विमान, १२ कोटीची गाडी, १० लाखाचा सूट”; मोदींच्या ‘फ्री रेवडी’ वक्तव्यावर आपचे ६ गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फ्री रेवडी’ संस्कृती देशाच्या विकासासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं. यावर सत्ताधारी आपने मोदींना प्रत्युत्तर दिलंय.

15 Photos
Photos : आवडता राजकीय नेता ते भाजपाचा सर्वात मोठा धोका, प्रशांत किशोर यांनी उत्तर दिलेले १२ रॅपिड फायर प्रश्न, वाचा…

इंडियन एक्स्प्रेसच्या ‘ई-अड्डा’ या कार्यक्रमात शेवटी प्रशांत किशोर यांनी १२ रॅपिड फायर प्रश्नांनाही थेट उत्तर दिली. त्याचा आढावा.

7 Photos
Photos : आम आदमी पार्टीचे ‘मिशन गुजरात’ सुरु, अरविंद केजरीवाल – भगवंत मान गुजरात दौऱ्यावर

पंजाबमधील विजयानंतर ‘आम आदमी पार्टी’च्या मुख्यमंत्र्यांचा गुजरात दौरा, डिसेंबरमध्ये आहेत गुजरात विधानसभा निवडणुका

ताज्या बातम्या

मराठी कथा ×