scorecardresearch

About News

अपघात News

लोकसत्ता डॉट कॉमच्या अपघात (Accident)या सदरामध्ये तुम्हाला अपघात दुर्घटना, अकाली मृत्यू, दुर्दैवी घटनांसंबधित बातम्या वाचता येतील. अपघात हा कित्येकदा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा मानवी चुकांमुळे होतो. झाड पडणे, वीज कोसळणे, आग लागणे, विजेचा धक्का लागणे यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे कित्येक लोक अपघाताला बळी पडतात; तर कित्येकदा अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र किंवा यंत्रणेतील बिघाडामुळेही अपघात होतात. नियम न पाळणे, उगाच नको ते धाडस करणे, योग्य खबरदारी न घेणे, अज्ञानामुळे, चुकीचे ज्ञान अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही अपघात होऊ शकतो. चूक कोणाचीही असली तरी अनेक जण अपघातांमध्ये बळी पडतातत. कित्येकदा लोक मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात करतात. तर कित्येकदा रेल्वेने प्रवास करताना लोक दरवाजात उभे राहून स्टंट करायला जातात आणि अपघाताला बळी पडतात. कित्येकदा लहान मुलांचेही अपघात होतात. कित्येकदा लहान मुलांनी काहीतरी वस्तू गिळल्याच्या किंवा खेळताना पाण्याच्या टाकीत किंवा खड्ड्यात पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.


मनुष्यच नव्हे, तर कित्येक प्राणी-पक्षीदेखील अपघातांना बळी पडतात; तर कधी प्राण्यांमुळेही मानवाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. सर्पदंश, बिबट्यांचा हल्ला, गाईंचा हल्ला, भटका कुत्रा चावल्याच्या अशा अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी विशेष खबरादारी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. अशा स्थानिक, शहर, राज्य, देश आणि विदेशांत होणाऱ्या अपघातांच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. कित्येकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशा व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
palghar district, workers await compensation amount
पालघर : अपघातांमध्ये मृत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कामगारांचे कुटुंब नुकसान भरपाईपासून वंचित

शेकडो प्रकरणे तहसील कार्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले असून स्थानीय पातळीवर तडजोड होत असल्याने कामगारांवर अन्याय होताना दिसत आहे.

Uttarakhand Tunnel Rescue 1
सिलक्यारा बोगद्यात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजुरांचा पगार किती?

मजुरांच्या सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी बोगद्याच्या वरील भागातून एकूण ८६ मीटपर्यंत खणावे लागले. बोगद्याच्या वरील भागातून १.२ मीटर व्यासाचे पाइप…

uttarakhand tunnel rescue operation insider speaks restless hungry prayed silently never lost hope
Uttarakhand tunnel: “अन्नाचा पहिला घास खाल्ला आणि…” ४०० तास बोगद्यात अडकलेल्या कामगारानं सांगितला “तो” अनुभव

Uttarkashi Tunnel Rescue Operation: मानसीक ताण कमी करण्यासाठी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना दिले गेले मोबाईल आणि बोर्ड गेम

gadchiroli 5 died in accidents iron ore, heavy vehicles transporting iron ore, heavy vehicles transporting iron ore accident
लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार? आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू; अहेरीत तणाव

मंगळवारी दुपारच्या सुमारास अहेरी येथील युवक सचिन नागुलवार (२९) याच्या दुचाकीला येलचील जवळ ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.

railway overbridge collapsed in manmad, manmad railway overbridge collapsed, british era railway overbridge collpased in manmad,
मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळला, इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प

मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती…

uttarkashi tunnel collapse 3 important issues in marathi, 41 tunnel workers trapped 3 important issued in marathi
सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांमुळे चर्चेत आलेले तीन मुद्दे… प्रीमियम स्टोरी

ही दुर्घटना घडून दोन आठवडे उलटल्यानंतरही आशा कायम आहे, पण या निमित्ताने चर्चेत आलेले अन्य महत्त्वाचे मुद्दे टीका करणारे वाटले…

death of child on mother birthday Bhayander
आईच्या वाढदिवसाला निघालेल्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू, भाईंदरमधील हृदयद्रावक घटना

पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबियाच्या दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत आईच्या मांडीवर असेलल्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

मराठी कथा ×