अफगाणिस्तान क्रिकेट टीम Videos

रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचा संघ अत्यंत धोकादायक मानला जातो. फिरकीबहुल आक्रमण ही या संघाची ताकद आणि आशियाई उपखंडातल्या खेळपट्ट्या फिरकीला पोषक आहेत. अफगाणिस्तानच्या बहुतांश खेळाडूंकडे भारतात खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. २०२३ वनडे वर्ल्डकपमध्येही अफगाणिस्तानने आपली ताकद दाखवून दिली होती. अफगाणिस्तानचा संघ सातवेळा टी२० वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला आहे. जिंकण्याचं प्रमाण ४० टक्के आहे. अफगाणिस्तानला फलंदाजीत सातत्य आणावं लागेल. मोठी धावसंख्या उभारण्यावर लक्ष द्यावं लागेल.