scorecardresearch

अजित आगरकर News

अजित भालचंद्र आगरकर (Ajit Agarkar)हे भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आहेत. ते ४ जुलै २०२३ पासून ते बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्हीही फॉरमॅटमध्ये २०० पेक्षा जास्त अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.१९९९, २००३ आणि २००७ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये त्यांचा समावेश होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या संघामध्येही अजित आगरकर होते.


अजित आगरकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९७६ रोजी मुंबईत झाला. फार लहानपणी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवत होते. आचरेकर सरांच्या सांगण्यावरुन अजित आगरकर यांना राजा शिवाजी विद्यालयातून शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेतला. शाळेमध्ये असताना अजित शिवाजी पार्क मैदानामध्ये सराव करत असत. याच काळात थोडी फार गोलंदाजी करु शकणार फलंदाज म्हणून ते विकसित झाले. पुढे वयवर्ष १५ असताना त्यांना अंडर-१६ आंतर शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायची संघी मिळाली. तेव्ह त्यांनी तिहेरी शतक झळकावले. मुंबईच्या संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण तेव्हा संघात एका गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे अजित आगरकर यांनी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. शालेय स्तरावरील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबईच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनले.


त्यांनी ७ ऑक्टोबर १९९८ रोजी अजित आगरकर यांनी पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या विरुद्ध टी-२० सामन्याच्या भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनी २६ आंतराराष्ट्रीय कसोटी सामने, १९१ एकदिवसीय सामने खेळले. या कसोटी फॉरमॅटमध्ये त्यांनी ५७१ धावा केल्या तर वनडे फॉरमॅटमध्ये १,२६९ धावा केल्या. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्यांनी कसोटी सामन्यात ५८ गडी बाद केले, तर एकदिवसीय सामन्यामध्ये २८८ गडी बाद केले. गोलंदाजी-फलंदाजीसह ते क्षेत्ररक्षणामध्येही तरबेज होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये २१ चेंडूमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजित आगरकर यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांनी सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा आणि १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. १९९९-२००० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आगरकर यांनी आगळा-वेगळा विक्रम केला होता. या दौऱ्यामध्ये ते सलग पाच वेळा शून्यावर बाद झाले. या विक्रमामुळे त्यांना बॉम्बे डक हे नाव पडले.


Read More
Kriti Sanon Mumbai apartment sale profit details | Ajit Agarkar property sale in Bandra | कृती सेनन अंधेरी फ्लॅट विक्री नफा | अजित आगरकर मुंबई घर मालमत्ता व्यवहार
Kriti Sanon: फक्त अभिनयच नाही, व्यवहारातही क्रिती सेनॉनची सरशी! मुंबईतील ४ घरे विकून मिळवला १०७ टक्के नफा

Kriti Sanon Property Sale Returns: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन, तिची बहीण नुपूर आणि आई गीता सेनन यांनी मुंबईतील अंधेरी येथील…

Ajit Agarkar Property
अजित आगरकरांनी विकले मुंबईतील अलिशान अपार्टमेंट; पाहा किती कोटींना झाला सौदा! फ्रीमियम स्टोरी

Ajit Agarkar Property : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात असलेल्या…

Why Suryakumar Yadav was sacked as India T20I captain Chief Selector Ajit Agarkar said Form a
सूर्याकडून भारताचं कर्णधारपद का काढून घेतलं? फक्त खराब फॉर्म नाही तर…; अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

Why Surya Dropped: सूर्यकुमार यादवला वगळून श्रेयस अय्यरला भारताचा नवा टी-२० कर्णधार करण्यात आला आहे. पण सूर्याकडून कर्णधारपद काढून घेण्याबाबत…

ajit agarkar
Ajit Agarkar: २०२७ वर्ल्डकपआधी BCCI चा मास्टरस्ट्रोक; अजित आगरकरांबाबत मोठा निर्णय

BCCI Extended Contract Of Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ बीसीसीआयने वाढवला आहे. २०२७ मधील…

ajit-agarkar-bcci-contract-extension-rumors-selection-committee-chairman-future-uncertainty
आगरकर यांच्या भवितव्याबाबत संभ्रम; करारवाढ संबंधित वृत्ताचे ‘बीसीसीआय’च्या अधिकार्‍याकडून खंडन

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाली आहे.

Gautam Gambhir Dedicate T20 WC Trophy to Rahul Dravid VVS Laxman Ajit Agarkar jay shah called in his low
‘मी ही वर्ल्डकप ट्रॉफी…”, गौतम गंभीरने T20 WC ट्रॉफी ‘या’ ३ दिग्गज खेळाडूंना केली समर्पित; वक्तव्याने जिंकली सर्वांची मनं फ्रीमियम स्टोरी

Gautam Gambhir on India Win: कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मिळून टीम इंडियाला टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावून…

Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा? राज ठाकरे म्हणाले, “कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण…”

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा मराठी असावा असे म्हटले आहे.

BCCI Central Contract 2025 26 Ajit Agarkar Suggest Removing A Plus Category Rohit Sharma Virat Kohli Demoted
अजित आगरकरांच्या सल्ल्यावरून सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार मोठे बदल? रोहित-विराटचं डिमोशन तर गिलला…

BCCI Central Contract: अजित आगरकरांनी बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टपूर्वी बीसीसीआयला एक सल्ला दिला आहे. ज्याचा थेट परिणाम आता रोहित-विराटवर होताना दिसणार…

shubman gill
Shubman Gill: “तो दर्जेदार खेळाडू आहे,पण…”, शुबमन गिलला वगळल्यानंतर अजित आगरकरांनी सांगितलं कारण

Team India Squad For T20 World Cup 2026: शुबमन गिलला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.…

BCCI to mediate in Gautam Gambhir Ajit Agarkar rift with Rohit Sharma Virat Kohli According to reports
गौतम गंभीर-आगरकर आणि रोहित–विराट यांच्यातील मतभेद आले समोर? BCCI करणार मध्यस्थी; टीम इंडियामध्ये नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma Virat Kohli: गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्याबरोबर रोहित-विराटचे असलेले मतभेद आता स्पष्टपणे उघड झाले असून BCCIलादेखील याची…

Sunil gavaskar , gautam gambhir
Sunil Gavaskar: “तुमचा ईगो ड्रेसिंग रुममध्ये ठेवा..”, गावसकरांनी गंभीर- आगरकरांना सुनावलं, म्हणाले…

Sunil Gavaskar: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी गौतम गंभीर आणि अजिक आगरकरांना सुनावलं आहे.