scorecardresearch

अजित पवार

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
Malvan rajkot fort Land subsidence near Shivaji maharaj statue raises doubts about construction quality
मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली; बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

राज्य सरकारने पुन्हा हा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले होते आणि हल्लीच याचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

Pune Polices PTP Traffic Cop app
‘माळेगाव’ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचे अजित पवार उमेदवार

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ गटातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजित…

Pune Polices PTP Traffic Cop app
हिंजवडीतील ‘जलकोंडी’ची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल; पाणी साठल्यास मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीला दंड

‘मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेच्या कामामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात पाणी साठत आहे पीएमआरडीए मेट्रो मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला दहा कोटी रुपये…

Pune Polices PTP Traffic Cop app
‘माॅडेल स्कूल’ संकल्पना राज्यभर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्यात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) राबविलेली ‘माॅडेल स्कूल’ ही संकल्पना राज्यात सर्वत्र राबविण्यात…

Controversy at Deputy Chief Minister Ajit Pawars event in Pune
पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

prahar sanghatana activists stopped Deputy Chief Minister Ajit Pawars speech
Ajit Pawar in Pune: प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं अजित पवारांचं भाषण

पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी गोंधळ घातला. यावेळी अजित पवारांनी भाषण थांबवत कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न…

Ajit Pawar
VIDEO : पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

अजित पवार एका कार्यक्रमात बोलत असताना प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून मोठा गोंधळ घातला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.
“फडणवीस-अजित पवार मिळून शेतकऱ्यांना फसवताहेत” – राष्ट्रवादीच्या नेत्याने सरकारची ‘मोडस ऑपरेंडी’च…

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.

Sanjay Shirsat comments on uddhav Thackeray raj thackeray alliance
मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो : संजय शिरसाट

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असताना, मंत्री संजय शिरसाट यांनी “आमच्या शुभेच्छा…

ajit gavahane
अजित गव्हाणे समर्थकांसह स्वगृही? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट, ‘राष्ट्रवादी’च्या शरद पवार गटाला धक्का

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले भोसरीचे अजित गव्हाणे हे २५…

संबंधित बातम्या