समाजवादी विचारसरणीच्या राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी नेहमीच ‘सामाजिक न्याया’चा आग्रह धरला आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात जवळपास अस्ताला चाललेल्या समाजवादी विचारसरणीसाठी आणि समाजवादी पार्टीसाठीही हा पुनरागमनाचा क्षण आहे का, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरेल.