scorecardresearch

अमित ठाकरे

अमित ठाकरे (Amit Thackeray) हे महाराष्ट्र राज्यातील नेते आहेत. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म २४ मे १९९२ रोजी मुंबईमध्ये झाला. अमित ठाकरे यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे मुंबईतील नामांकित अशा पोद्दार महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आहे. त्यांना वडील राज ठाकरे यांच्याप्रमाणे स्केचिंग आणि पेंटिंग करण्याची आवड आहे. त्याशिवाय त्यांना फुटबॉल खेळण्याचा छंद आहे. ते या खेळाचे मोठे चाहते आहे.


अमित ठाकरे हे लहानपणापासून माध्यमांपासून लांब राहत आले आहेत. त्यांच्या बहिणेचे नाव उर्वशी ठाकरे असे आहे. अमितप्रमाणे त्याही प्रकाशझोतात राहणं टाळतात. अमित ठाकरे यांच्या पत्नीचे नाव मिताली बोरुडे असे आहे. अमित आणि मिताली यांची पहिली भेट महाविद्यालयात असताना झाली. पुढे त्यांच्यात मैत्री होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०१७ मध्ये अमित ठाकरे खूप आजारी पडले होते. त्यांच्या आजारपणामुळे ठाकरे कुटुंब फार चिंतेत होते. याचा काहीसा परिणाम राज ठाकरे यांच्यावरही झाला. त्या काळात राज यांनी कुटुंबाकडे लक्ष दिले होते. अमित यांच्या आजारापणात मिताली यांनी त्यांची फार काळजी घेतली. त्यात त्यांच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट झाले. २०१९ मध्ये त्यांनी लग्न केले. २०२२ मध्ये या दांपत्याला पुत्ररत्न लाभले. त्यांच्या मुलाचे नाव किआन ठाकरे असे आहे.


अमित ठाकरे हे प्रकाशझोतापासून लांब राहत असले तरी त्यांनी राज यांना संपूर्ण राजकीय प्रवास जवळून पाहिला होता. कालांतराने त्यांनीही राजकारणामध्ये रस घ्यायला सुरुवात केली. २०१६-१७ पासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थानिक स्तरावरील राजकारणामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. २०२० मध्ये राज ठाकरे यांंनी जाहीर सभा घेत पक्षाच्या नव्या ध्वजाची आणि नव्या धोरणांबाबतची घोषणा केली. या सभेमध्ये त्यांनी अमित ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाची घोषणा देखील केली. २०२० पासून ते आतापर्यंत अमित मनसे पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. काही महिन्यांपूर्वी टोल प्रकरणावरुन अमित चर्चेत आले होते. एका टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. यावरुन वाद पेटला. तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या टोलनाक्याची तोडफोड केली होती.


Read More
Vasant Mores resignation and discussion of Amit Thackerays that phone call
Vasant More on MNS Resignation: वसंत मोरेंचा राजीनामा अन् अमित ठाकरेंच्या ‘त्या’ फोनची चर्चा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या…

Amit Thackeray pune
अमित ठाकरे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार? म्हणाले, “मला नगरसेवक..”

लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीदेखील सुरु केली आहे.

MNS Morcha Pune:"आता त्यांचे डोळे आणि कान उघडले असतील", पुणे विद्यापीठामध्ये अमित ठाकरे काय म्हणाले?
MNS Morcha Pune:”आता त्यांचे डोळे आणि कान उघडले असतील”, पुणे विद्यापीठामध्ये अमित ठाकरे काय म्हणाले?

पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची दखल कुलगुरू शरद गोसावी यांनी घेतली आहे.आम्ही…

pune mns student wing president amit thackeray s marathi news, amit thackeray marathi news, amit thackeray latest marathi news
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने आठ दिवसांत कार्यवाही करावी, अन्यथा…”, अमित ठाकरेंचा इशारा

शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मूक…

Amit Thackeray on Pune Loksabha:"पक्षाचा आदेश...", पुणे लोकसभा निवडणूकीबद्दल अमित ठाकरे काय म्हणाले?
Amit Thackeray on Pune Loksabha:”पक्षाचा आदेश…”, पुणे लोकसभा निवडणूकीबद्दल अमित ठाकरे काय म्हणाले?

पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे…

MNS silent Protest in pune presence of MNS leader amit thackeray
MNS Morcha Pune:मनसेच्या मूक मोर्चाला सुरुवात!, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी जाणार थेट विद्यापीठात

पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे…

Amit Thackeray Pune
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अमित ठाकरे यांचा पुणे विद्यापीठावर मूक मोर्चा

पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे…

amit thackeray hint to contest pune lok sabha seat
पुणे: अमित ठाकरे यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत…

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मनविसेतर्फे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोर्चा काढण्यात येणार आहे.

Mahesh Jadhav Ajit pawar Amit Raj Thackeray
‘नमक हराम’ सिनेमाचा दाखला देत अजित पवारांची मनसेवर टीका, मारहाण झालेले महेश जाधव राष्ट्रवादीत

मनसे नेते अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचा आरोप करून चर्चेत आलेल्या महेश जाधव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी…

मनसेच्या ब्रास बँड महोत्सवाला अमित ठाकरे यांची हजेरी!, बँड वाजवण्याचाही घेतला आनंद | Amit Thackeray
मनसेच्या ब्रास बँड महोत्सवाला अमित ठाकरे यांची हजेरी!, बँड वाजवण्याचाही घेतला आनंद | Amit Thackeray

मनसेच्या ब्रास बँड महोत्सवाला अमित ठाकरे यांची हजेरी!, बँड वाजवण्याचाही घेतला आनंद | Amit Thackeray

Amit Thackeray
अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप, मनसेकडून अख्खी कामगार संघटना बरखास्त, सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, नेमकं प्रकरण काय?

मनसेचे पदाधिकारी महेश जाधव यांनी जखमी अवस्थेत स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दावा केला आहे…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×