अण्णा हजारे (Anna Hazare)ऊर्फ किसन बाबूराव हजारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असून त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांनी लोक चळवळीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी गावाचा कायापालट केला. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९९० साली पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपल्या जीवनात भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल बिलासाठी अनेक आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनामुळे भारत सरकारला २००५ साली माहितीचा अधिकार कायदा संमत करावा लागला. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यानंतरच आम आदमी पक्षाची स्थापना केली.Read More
लोकायुक्त विधेयकानुसार मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची चौकशी करण्यासाठी परवानगीची गरज लागणार आहे, असा आरोप संविधान अभ्यासक, मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी…