Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

अनुप कुमार

दिग्गज कबड्डीपटू आणि भारताचा माजी कर्णधार अनुप कुमारने १९ डिसेंबर २०१८ रोजी निवृत्ती घेतली. अर्जुन पुरस्कार विजेते अनूप कुमार यांनी २००६ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. २०१० आणि २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्याला तो बोनसचा बादशहा आणि कॅप्टन कूल म्हणूनही ओळखले जात असे. अनूप हा २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय संघाचा कर्णधार होता. तसेच अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुंबा आणि आणि जयपूर पँथर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर तो पुणेरी पलटन संघाचा प्रशिक्षकही आहे.Read More

संबंधित बातम्या