अनुष्का शर्मा ही बॉलिवूडच्या टॉप १० अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. अनुष्काने २००९ मध्ये आदित्य चोप्राच्या ‘रब ने बना दी जोडी’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती बदमाश कंपनी, बँड बाजा बारात, पटियाला हाऊस, लेडीज VS रिक्की बहल, पीके या चित्रपटात झळकली. ती क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर विवाहबंधनात अडकली. त्या दोघांना वामिका नावाची एक गोड मुलगी आहे.