scorecardresearch

आशिष मिश्रा

आशिष मिश्रा (Ashish Mishra) हे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आहेत. २०२०-२१ च्या दरम्यान देशभरात शेतकरी आंदोलन सुरु होते. याच पार्श्वभूमीवर अजय मिश्रा यांच्या लखीमपूर खेरी या मतदारसंघामधील अनेक शेतकरी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तेव्हा सप्टेंबर २०२१ मध्ये प्रदेशात अजय मिश्रा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये आंदोलक सामील झाले आणि त्यांनी अजय यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक सभासद उपस्थित होते. त्यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तेव्हा आंदोलकांना संबोधून अजय मिश्रा यांनी आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य खूप जास्त चर्चेत आले. त्यानंतर त्या परिसरामध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतकरी आंदोलन सुरु होते. तेव्हा अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी त्या ठिकाणी भरधाव गाडी चालवत नेली. तेव्हा त्यांनी शेतकरी आंदोलकांना अक्षरक्ष: चिरडले. या घटनेमध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला. शिवाय तेथे असलेले अनेक आंदोलक देखील जखमी झाले. त्याप्रकरणी पोलिस चौकशी होऊन आशिष मिश्रा यांना अटक देखील करण्यात आली.


पुढे आशिष एका वर्षासाठी तुरुंगात होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. खटला सुरु असल्याने न्यायालयाने खटला संपेपर्यंत एखाद्या आरोपीला तुरुंगात ठेवणं, योग्य नाही, असे आपल्या निर्णयात म्हटलं आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.


Read More
लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या मामाला व त्यांच्या मुलाला दुचाकीवरून जाताना पाठीमागून जीपची धडक देत उडवले.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: ताठरही नाही की तडजोडवादी नाही.. वंचित बहुजन आघाडी तर संधीवादी!

लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी प्रत्येक जात समूहाला राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ही व्यापक भूमिका मांडत बाळासाहेब आंबेडकर नेहमी  तशी धोरणे आखत आहेत.

nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

अगदी मन लावून देशाच्या अर्थकारणाचा गाडा हाकणाऱ्या आपल्या निर्मलाताई खरंच खूप प्रामाणिक आहेत हो! पैसे नाहीत म्हणून लोकसभा लढणार नाही…

baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!

आज अनेकांस ठाऊकही नसेल पण एकेकाळी या राज्यातील लक्ष्मणराव बळवंत फाटक नामे निवृत्त रेल्वे कारकुनास सरकारी कंत्राटांसाठी एक कंपनी काढावीशी…

Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानच्या नाविक हवाई तळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका प्रकल्पावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तेथे कार्यरत…

Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

लतिका, इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी, कॉलेजशी जुळवून घेण्यास असमर्थता, शैक्षणिक अडचणी या चिंतेसह मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि करिअर समुपदेशनासाठी तिला माझ्याकडे पाठवण्यात…

Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढऱ्या…

संबंधित बातम्या