आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.
ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.
मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे. Read More
गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मागील वर्षी प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा…
त्यांच्या जीवनातील ‘राष्ट्राय स्वाहा’ ही त्याग, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेची भावना आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरणारी आहे, असे प्रतिपादन…
मानवी उत्क्रांतीचे पुरावे असलेल्या कोकणातील ऐतिहासिक कातळशिल्पांचे (पेट्रोग्लिफ्स) पूर्ण संरक्षण करूनच रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्पांचा विचार केला जाईल, अशी ग्वाही…
नाशिकच्या पवित्र त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ६ जुलै रोजी आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेत्री संस्कृती बालगुडे सादरीकरण करणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती, जाहिराती फलक समाज माध्यमे व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यास प्रतिबंध करणारे…
राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले आणखी ४४ खटले मागे घेण्याची शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने सरकारला केली आहे.