ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम News

वर्ल्डकप जेतेपदं आणि ऑस्ट्रेलिया यांचं सख्य सर्वश्रुत आहे. पण टी२० प्रकारात ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपदाशी सख्य राखता आलेलं नाही. यामुळेच ९ वेळा वर्ल्डकपमध्ये खेळूनही ऑस्ट्रेलियाकडे या प्रकारात केवळ एक जेतेपद आहे. ऑस्ट्रेलियाचा टेस्ट आणि वनडे प्रकारातील कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे या वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार नाही. मिचेल स्टार्कने या प्रकारातून निवृत्ती स्वीकारली आहे. जोझ हेझलवूड दुखापतीमुळे सुरुवातीच्या टप्प्यात खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथची वर्ल्डकपसाठी निवड झालेली नाही. ऑस्ट्रेलियाची भिस्त धडाकेबाज सलामीची जोडी ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्यावर आहे. ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड आणि कॅमेरुन ग्रीन हे अष्टपैलू त्रिकुट ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरू शकतं.
Read More
