Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ Photos


१९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची (CWG 2022) ही २२वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ११ देशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश आहे. विविध देशांतील ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.

२८ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम (Birmingham 2022) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) २२व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर ही स्पर्धा पार खेळवली जात आहे. गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे.

भारत १८ व्यांदा या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य पदके जिंकली आहेत. २००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) ही, २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर ब्रिटनमधील सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे. बर्मिंगहॅममध्ये आयोजित खेळांसाठी ७७८ दशलक्ष पौंड (सुमारे ७४ अब्ज) खर्च झाला आहे.
Read More
CWG 2022 Medals
12 Photos
Photos: ४०वर्षीय अचंता शरथ कमल ते पीव्ही सिंधू; ‘या’ भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावली अनेक पदकं

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले.

15 Photos
Photos : एकेकाळी खायला भाकरी नव्हती, १२ किमी पायपीट, सैन्यात राहून देशसेवा केली, रौप्य पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेच्या संघर्षाची अनटोल्ड स्टोरी

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे.

Indian Women Cricket Team
9 Photos
Photos: स्मृती मंधानाच्या विक्रमी अर्धशतकाच्या बळावर राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा डंका

CWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली आहे.

Gold medalist Achinta Sheuli
9 Photos
Photos: रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील मुलगा ते कॉमनवेल्थचा ‘गोल्डनबाय’! अचिंत शेउलीची थक्क करणारी कामगिरी

CWG 2022 Gold medalist Achinta Sheuli : अचिंतने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

Ind Vs Pak T20 in CWG 2022
6 Photos
Photos : भारताच्या ‘फियरलेस ब्युटीज’ पडल्या पाकिस्तानवर भारी! राष्ट्रकुल स्पर्धेतील सामन्यात मिळवला दणदणीत विजय

IND W vs PAK W: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारतीय मुलींनी पाकिस्तानच्या संघाला वरचढ होऊ दिले नाही.