scorecardresearch

About News

डोंबिवली News

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.


सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.


डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.


Read More
chief minister, eknath shinde image, eknath shinde image on hawkers handcarts
फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर मुख्यमंत्र्यांची छबी, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात हातगाड्यांचा शिरकाव

फेरीवाल्यांनी लावलेल्या रसवंती, शिव वडापावच्या हातगाड्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबी झळकत आहे.

Three arrested for murder
डोंबिवली : किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या तिघांना अटक

एकत्रितपणे दारू पित असताना झालेल्या किरकोळ भांडणातून येथील तीन जणांनी फुले नगरमधील एका ४४ वर्षांच्या नागरिकाचा दोन दिवसांपूर्वी खून केला.

illegal construction Kumbharkhanpada
डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे नव्याने बेकायदा बांधकामाला सुरुवात, जुनाट झाडे तोडून पोहच रस्ता उपलब्ध नसताना बांधकामाला प्रारंभ

खंडोबा मंदिराच्या पाठीमागील भागात भूमाफियांनी गेल्या महिन्यापासून नव्याने एका बेकायदा इमारतीच्या उभारणीला सुरुवात केली आहे.

Madhukarrao Chakradev Dombivli
डोंबिवलीतील ज्येष्ठ उद्योजक मधुकरराव चक्रदेव यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डोंबिवलीतील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक संस्थांचे मार्गदर्शक, उद्योजक मधुकरराव चक्रदेव यांचे सोमवारी सकाळी येथील…

Former Vice-Chancellor assault case protest by teachers of Vidyaniketan School in Dombivli
माजी कुलगुरू प्रधान मारहाण प्रकरण, डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षकांकडून काळ्या फिती लावून निषेध

माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मानपाडा-उंबार्ली येथील विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षकांनी शनिवारपासून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरू…

Traffic jam due to slow speed road works in Dombivli
डोंबिवली गणेशनगर मधील संथगती रस्ते कामामुळे वाहन कोंडी

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदाना जवळील गणेश नगर भागात मागील २० दिवसांपासून २० ते २५ फूट लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू…

Garbage heaps Dombivli Garibachapada
डोंबिवली गरीबाचापाडा, देवीचापाडा, नवापाडा भागात कचऱ्याचे ढीग, मलनिस्सारणाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण

डोंबिवली येथील पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील गरीबाचापाडा, देवीचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा भागातील परिघ क्षेत्र चाळी असलेल्या भागात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला…

Dust in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीत धुळीचे लोट, धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एमआयडीसीकडून कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी

डोंबिवली एमआयडीसी परिक्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या…

roadside tree Sunil nagar Dombivli
डोंबिवलीतील सुनीलनगरमध्ये रस्त्याच्याकडेचे झाड तोडल्याने नाराजी, रहिवाशांबरोबर पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

डोंबिवली येथील पूर्व भागातील सुनील नगरमधील ग प्रभाग कार्यालयासमोरील रस्ते, गटाराला बाधा न येणारे बहरलेले गुलमोहराचे जुने झाड तोडण्यात आले…

rent agreement Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील सोसायटीधारकांचे भाडे करार वाढणार

भाडे करारनाम्याचे मागील काही वर्षांपासून नुतनीकरण होत नसल्याने औद्योगिक क्षेत्रातील निवासी विभागातील सदनिकाधारक अस्वस्थ होते.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×