scorecardresearch

दसरा २०२६ News

‘दसरा’ किंवा ‘विजयदशमी’ (Dussehra) हा हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. दसरा हा या शुभ मुहूर्तांपैकी एक आहे असे मानले जाते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्ण होते अशी अनेकांची आस्था आहे. यामुळे पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या दिवशी राजे-महाराजे आपल्या सैन्यासह लढाई करण्यास निघत असत असेही म्हटले जाते. क्षत्रियांप्रमाणे व्यापारी मंडळीही याच दिवशी व्यापारासाठी बाहेर पडत, गावची सीमा ओलांडत असत. गावाची, नगराची सीमा ओलांडण्याच्या याच कृतीवर दसऱ्याशी निगडीत “सीमोल्लंघन करणे” ही म्हण प्रचलित झाली असा अंदाज लावला जातो. मुळात सीमोल्लंघन करणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नव्या ध्येयासाठी पुढे जाणे होय.


दसऱ्याला (Dasara)काहीजण विजयदशमी असेही म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैत्य महिषासुर आणि दुर्गा यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. या युद्धाचा शेवट दसराच्या दिवशी झाला. अश्विन दशमीच्या दिवशी विजय मिळाल्यामुळेही या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणत असावेत असे असू शकते. दसऱ्याशी अन्य पौराणिक गोष्टीही संबंधित आहेत. भगवान श्रीराम यांनी राक्षसांचा राजा रावण यांचा वध दसऱ्याला केला होता. यामुळेच दसऱ्याला रावणवध देखील साजरा केला जातो. भारतात त्यातही उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दसऱ्याला रावणाचे मोठ्ठाले पुतळे तयार करुन ते जाळले जातात. या पुतळ्यांसह आपल्या सर्वांच्या आत असलेली नकारात्मक शक्तीही नाहीशी होवो असा विचार दडलेला आहे असे म्हटले जाते.


दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले म्हणजेच त्यांनी सीमोल्लंघन केले. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी म्हणून आपापली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती. दसऱ्याला सर्व पांडवांनी ती शस्त्रे बाहेर काढून त्या पाचही भावंडांनी शस्त्रांची पूजा केली. यामुळेच आपल्याकडे विजयादशमीच्या, दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा केली जाते. पूजा करताना सरस्वती मातेचे आवाहन देखील केले जाते. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या जातात.


Read More
Kalyan Dombivli Navratri Mandap Traffic Jam | KDMC Navratri Permission Rules | Vijay Ahire Traffic Police Action | Kalyan Dombivli Political Banners Road Block
नवरात्रोत्सवाच्या मंडपांनी अडवले डोंबिवली, कल्याणमध्ये रस्ते; राजकीय बॅनरबाजीला उधाण

येजा करताना प्रवासी, वाहन चालकांना त्रास होत आहे. बहुतांशी नवरात्रोत्सवांच्या मंडपात वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यात आता राजकीय…

Kolhapur Mahalaxmi Temple Navratri | Vijay Rathod Kolhapur Collector | Navratri Festival Kolhapur Safety Rules | Kolhapur News Marathi
कोल्हापुरातील नवरात्र उत्सवात अन्न औषध प्रशासनाने देवीच्या प्रसादाबाबत दक्षता घ्यावी; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता कामांना वेग आला असून गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.

Edible Oil Import Duty Cut India | Cooking Oil Price Drop Dasara Diwali | B V Mehta Solvent Extractors Association | Palm Oil Soybean Sunflower Oil Tax Cut India
दसरा, दिवाळीत खाद्यतेल स्वस्त? खाद्यतेलावरील आयात शुल्कात ११ टक्क्यांपर्यंत कपात

जागतिक बाजारातील २५ टक्के दरवाढ आणि अपुऱ्या पावसामुळे तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Crowds of chicken, mutton and fish eaters throng the market as the festival ends
अबब! सणवार संपताच चिकन, मटण, मासे खाणाऱ्यांची बाजारात गर्दी; सध्याचे वाढलेले दर माहिती आहे का?

गेल्या काही आठवड्यांपासून उत्सवांमुळे अनेकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, सण उत्सव संपताच मांसाहारींनी पुन्हा बाजाराकडे धाव घेतली आहे.

Heavy rains and flooding threaten this years festival
उत्साहाविना पार पडला दसरा, दिवाळीवरही सावट; शेतमालाअभावी बाजारपेठेत ना उलाढाल, ना चैतन्य

सकाळी ८० रुपये किलो प्रमाणे विकली जाणारी झेंडूची फुले शेवटी ४० ते ५० रुपये किलोवर आल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचाही हिरमोड…

Shalivahan Shaka calendar, Hindu calendar rules, Panchang compliance, missing lunar month, lunar calendar adjustments, Hindu month names, Hindu calendar,
काळाचे गणित : नियमबद्धतेसाठी किरकोळ गैरसोय

‘काळाचे गणित’ सोडवताना नियम तर हवेत. पण त्याने सर्वसामान्यांची काहीही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता पंचांगकर्त्यांनी घेतली आहे. पण…

Worship of Bhavani Talwar by Udayanraje in Satara
साताऱ्यात उदयनराजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन; विजयादशमीचा पारंपरिक सोहळा उत्साहात

या वेळी जलमंदिर येथील भवानी देवी मंदिरामध्ये ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या भवानी तलवारीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.

Grand procession in Akola on the occasion of Dhamma Chakra Pravartan Day
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात भव्य मिरवणूक; चित्तधरारक प्रात्यक्षिकांचा थरार, ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात…

या मिरवणुकीत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हजाराे अनुयायांनी…

Two youths from Daroda village in Hinganghat Wardha drowned in Vana river
Vidio: दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, एक वाचला. विसर्जन सोहळा आणि तणावाची घटना पण…

हे दोघेही दारोडा येथील रहिवासी असून देवी विसर्जनासाठी नदीकाठी गेले होते. मात्र विसर्जनाच्या वेळी पाण्यात तोल जाऊन दोघेजण वाहून गेले.…

Important statement by former President of India Ram Nath Kovind
संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती म्हणतात…. संविधानामुळे सर्वोच्च पद

कोविंद म्हणाले की, “मी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातून आलो आहे. पण आज मी ज्या पदावर पोहोचलो, त्याचे संपूर्ण श्रेय…