scorecardresearch

गौतमी पाटील Photos

गौतमी पाटील एक डान्सर आहे. व्हायरल डान्स व्हिडीओमुळे ती पहिल्यांदा चर्चत आली होती. विविध कार्यक्रमांमध्ये ती लावणी सादर करत असते. १९९६ मध्ये गौतमीचा जन्म शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील गावामध्ये झाला. लहानपणी गौतमीचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. त्यामुळे गौतमी तिच्या आईसह मामाच्या गावी म्हणजेच शिंदखेडाला राहायला गेली. याच गावामध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षणामध्ये रस नसल्याने तिने आठवीमध्ये असतानाच शाळा सोडली. शाळा सोडून गौतमी पुण्यात राहू लागली. घरी हालाखीची परिस्थिती असल्याने तिला सुरुवातीला मिळेल ते काम करावे लागले. काही महिन्यांनंतर ती डान्स शोमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करु लागली.

अश्लील डान्स स्टेप्समुळे तिच्या कार्यक्रमांना गर्दी वाढू लागली. दरम्यानच्या काळात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पण त्याचबरोबरीला नाचण्याच्या पद्धतीवरुन तिला ट्रोल देखील केले गेले. सध्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये नाचण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या डान्सर्समध्ये गौतमी पाटीलचा समावेश होतो.
Read More
Gautami Patil Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026
9 Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गौतमी पाटीलने शेअर केले खास फोटो

दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांचा मोठा जनसागर लोटला आहे.

Gautami Patil Gudi Padwa 2026
9 Photos
Photos: नऊवारीचा थाट अ्न मराठमोळा साज; गौतमी पाटीलचं गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट

Gautami Patil Gudi Padwa 2026: नवीन उद्योग, व्यवसायाचा आरंभ करण्यासाठी आणि नव्या संकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी हा दिवस अत्यंत पवित्र समजला…

Radha Patil and Gautami Patil
9 Photos
राधा पाटील आणि गौतमी पाटील यांच्यात वादाची ठिणगी का पडली? सांगलीतल्या अपमानाचं प्रकरण काय?

गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यात एका शब्दावरुन वाद निर्माण झाला होता, हे प्रकरण नेमकं काय आहे?

ताज्या बातम्या