गोपीचंद कुंडलिक पडळकर (Gopichand Padalkar)हे महाराष्ट्रामधील नेते आहेत. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९८२ रोजी सांगली जिल्ह्यामधील पडळकरवाडीमध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्याने पडळकरांवर त्यांचा प्रभाव पडला. गोपीचंद पडळकर हे सुशिक्षित राजकारण्यांपैकी एक आहेत. ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय समाज पक्षमध्ये प्रवेश करत झाला. त्यानंतर पक्षांतर करत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. काही कारणास्तव त्यांनी भाजपमधूनही माघार घेतली. नंतर ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाले. नंतर पुन्हा पक्षांतर करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
१४ मे २०२० रोजी ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांना चित्रपट व्यवसायामध्ये काम करण्याचा अनुभव आहे.Read More
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुसंख्य गावांची स्थिती व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीसारखी होत असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय कुरघोड्या करण्यात मग्न राहत असतील…