Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

हर्षल पटेल Photos

हर्षल पटेल हा भारतीय गोलंदाज आहे. त्याचा जन्म २३ नोव्हेंबर १९९० रोजी गुजरातमध्ये झाला. क्रिकेटचे वेड असलेल्या हर्षदचे कुटुंब भारत सोडून अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी स्थलांतरित होणार होते. पण हर्षलच्या मोठ्या भावाला त्याचे क्रिकेटविषयीचे प्रेम दिसले आणि त्यांनी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. २००८-०९ च्या अंडर-१९ विनू मंकड ट्रॉफीमध्ये २३ गडी बाद करत तो सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. त्यानंतर तो गुजरातसाठी काही सामने खेळला. अंडर-१९ विश्वचषक संघामध्येही त्याचा सहभाग होता. २०१२ मध्ये त्याला बंगळुरुच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर तो २०१८ मध्ये दिल्लीच्या संघामध्ये होता. २०२१ मध्ये तो पुन्हा आरसीबी संघात गेला. ९ एप्रिल २०२१ रोजी बंगळुरु विरुद्ध मुंबई सामन्यादरम्यान संघामध्ये त्याला सामील करण्यात आले. या सामन्यामध्ये त्याने मुंबईचे ५ गडी बाद केले. या सामन्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याने न्यूझीलंड विरुद्ध टी-२० सामन्यामध्ये सहभागी होत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यामध्ये दोन गडी बाद केल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.Read More
IPL 2024 Awards List
8 Photos
IPL 2024: विराट कोहलीपासून ते नवख्या नितीश रेड्डीपर्यंत हे खेळाडू ठरले मोठ्या पुरस्कारांचे मानकरी, एका क्लिकवर पाहा यादी

IPL 2024 Awards List: श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले आहे. यासह यंदाच्या आयपीएल…