आयसीसी विश्वचषक २०२३

५ ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक २०२३(ICC World Cup) ची सुरुवात झाली. दर चार वर्षांनी क्रिकेटच्या या महास्पर्धेचे आयोजन केले जाते. २०१९ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची धुरा इंग्लंडकडे होती. त्यावर्षी इंग्लंडच्या संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरुन इतिहास रचला. या वर्षी भारतामध्ये विश्वचषक स्पर्धा संपन्न होत आहे. क्रिकेट हा खेळ सध्या जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. युरोपामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये क्रिकेट प्रामुख्याने खेळला जात आहे. तेव्हा फक्त कसोटी सामने खेळवले जात असत.


१९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. त्या सुमारास क्रिकेटला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. १९१२ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा तीन देशांनी मिळून कसोटी मालिकेचे आयोजन केले होते. हळूहळू अशा कसोटी सामन्यांचे प्रमाण वाढू लागले. पुढे १९२८ मध्ये वेस्ट इंडिज, १९३० मध्ये न्यूझीलंड, १९३२ मध्ये भारत आणि १९५२ मध्ये पाकिस्तान या देशांनी कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात १९६० मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांऐवजी कमी ओव्हर्सचे सामने भरवण्यात आले. पुढची काही वर्षे इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांच्या तुलनेमध्ये कमी ओव्हर्स असलेले सामने खेळवण्याचे प्रमाण वाढले. या फॉरमॅटमध्ये दोन्ही इनिंग्स एकाच दिवशी पूर्ण होत असतं.


पुढे १९७०-७१ मध्ये एकदिवसीय किक्रेट फॉरमॅटला सुरुवात झाली. त्यानंतर क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे आणि खेळाची वृद्धी व्हावी या उद्देशाने इंग्लंडने पुढाकार घेत १९७५ मध्ये पहिल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले. तेव्हा स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका हे आठ देश सहभागी झाले होते. १९७५ आणि १९७९ या दोन वर्षांमध्ये वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकत क्रिकेट जगतामध्ये दबादबा निर्माण केला. पुढे १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये क्रमवारी ऑस्ट्रेलिया (१९८७), पाकिस्तान (१९९२) आणि श्रीलंका (१९९६) असे विश्वचषकात विजेतेपद राखले. ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅटट्रिक झाल्यावर २०११ मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषक विजेता बनला. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त (५ वेळा) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांनी दोनदा तर पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड या देशांनी एकदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. यंदाच्या विश्वचषक २०२३ मध्ये कोण विजेता ठरणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.


विशेष बाब म्हणजे पहिल्या तीन विश्वचषकामध्ये (Cricket World Up) प्रत्येक सामना हा ६० षटक म्हणजे ओव्हरचा होता. १९८७ मध्ये ही मर्यादा ५० ओव्हर्स इतकी करण्यात आली. तेव्हा विश्वचषकाच्या चौथ्या हंगामामध्ये सामन्यांमध्ये दोन्ही संघांना ५० षटक क्रिकेटचा खेळ खेळावा लागे. ओव्हर्सप्रमाणे इतर अनेक गोष्टी काळानुरुप बदलत गेल्या आहेत. जुन्या नियमांच्या जागी नवे नियम लागू करण्यात आले आहे.


Read More
ICC to consider special fund to save Test cricket sport news
कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी विशेष निधीचा ‘आयसीसी’चा विचार

 कसोटी क्रिकेटचे भविष्य टिकवण्यासाठी किमान १.५ कोटी अमेरिकन डॉलरचा निधी राखीव ठेवण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) विचार आहे.

rohit sharma & travis head
Ind vs Aus T20 World Cup: रोहित शर्माने वादळी खेळी आणि ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडत केली अहमदाबादची परतफेड

रोहित शर्माने १९ नोव्हेंबर रोजी वनडे वर्ल्डकपच्या फायनल स्पर्धेत झालेल्या घटनांची परतफेड केली.

How Are the Teams Divided into T20 Groups for Super8
Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर प्रीमियम स्टोरी

T20 World Cup 2024 Super8 Explainer: येत्या १९ जूनपासून सुपर८ चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर८ चे सामने कसे खेळवले…

Babar is not even worthy of Virat Kohli's shoes
IND vs PAK : ‘बाबरची कोहलीच्या पायताणाचीही लायकी नाही’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची टोकदार भाषेत टीका

Danish Kaneria’s Statement : भारत आणि पाकिस्तान हे दोन देश आहेत जे नेहमीच त्यांच्या भौगोलिक स्थानामुळेच नव्हे, तर त्यांच्या रोमांचक…

Pakistan cricket team for hosting private dinner party worth 25 dollars during T20 World Cup 2024
T20 WC 2024 : पाकिस्तान क्रिकेट संघाने चाहत्यांकडून उकळले पैसे? खेळाडूंसह खाजगी डिनर करण्यासाठी एवढी रक्कम घेतल्याचा आरोप

Pakistan Cricket Team : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जूनपासून अमेरिकेत सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पाकिस्तानी संघ…

India Vs Ireland Match Updates in Marathi
T20 World Cup 2024 : आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मासह कोण सलामी देणार? प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले उत्तर

IND vs IRE Match : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्मासोबत संजू सॅमसन सलामीवीर म्हणून आला होता. पण तो आपल्या फलंदाजीने प्रभावित…

Jasprit Bumrah doesn't give extra information to anyone
“…म्हणून युवा वेगवान गोलंदाजांना जास्त शिकवण्याचा प्रयत्न करत नाही”: जसप्रीत बुमराह असं का म्हणाला? जाणून घ्या

Jasprit Bumrah Statement : यंदा आतापर्यंतचा सर्वात मोठा टी-२० विश्वचषक असून एकूण २० संघ सहभागी होत आहेत. २०२२ मध्ये पाकिस्तानचा…

Virat's Reaction to T20 World Cup in America
T20 WC 2024 : “मी कधीही विचार केला नव्हता की…”, अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य

Virat Kohli Video : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जून पासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा यंदा अमेरिका…

Yuvraj's statement on Sanju Samson
Team India : ऋषभ की संजू , खरा ‘मॅच विनर’ कोण? युवराजने टी-२० विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूला दिले प्राधान्य

Yuvraj Singh Statement : आयसीसीने युवराज सिंगची टी-२० विश्वचषक २०२४ साठी ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, त्याने टीम इंडियाच्या…

Ajit Agarkar's reaction to Virat's strike rate
T20 WC 2024 : विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल विचारताच हिटमॅनला आले हसू, तर अजित आगरकर म्हणाले…

Virat Kohli strike rate : आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज टीम इंडियाचा कर्णधार…

Ajit Agarkar's reaction to Hardik
T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याच्या निवडीवर अजित आगरकरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “तो जे करु शकतो त्याचा…”

Ajit Agarkar’s statement: आयपीएलमध्ये खराब कामिगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं विश्वास दाखवला आहे. हार्दिक पंड्याला टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान का…

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Match Updates in marathi
T20 World Cup 2024 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांसाठी प्रचंड मागणी, तब्बल २०० पट अधिक लोकांनी केली नोंदणी

ICC T20 World Cup 2024 Updates : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा शानदार सामना पाहण्यासाठी चढाओढ…

संबंधित बातम्या