scorecardresearch

About Videos

भारतीय अर्थव्यवस्था Videos

भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy)मुख्यत्वे कृषीवर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मात्र १९९१ सालानंतर उदारिकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणामुळे भारताचे उद्योग, व्यापार क्षेत्र विस्तारले. परिणामी सध्या भारताची वाटचाल मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. १९५१ साली भारताची सुमारे ६० टक्के जनता ही कृषी तसेच कृषीशी संलग्नीत अन्य व्यवसायांमधून अर्थार्जन करत होती. मात्र सध्या भारतात तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्योग, व्यापार, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांत बरीच प्रगती झाली आहे. ज्यामुळे सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. २०१८ साली जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर होती.
जागतिक बँकेनुसार २०१८ साली भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७३ ट्रिलियन डॉलर्स होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थचे आकारमान ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.
Read More

ताज्या बातम्या

मराठी कथा ×