scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

भारतीय नौदल News

भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.

भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
Read More
High Court ruling on military pension, Disability pension for lifestyle diseases, Mumbai High Court news
निवृत्तीवेतन ही सरकारच्या मर्जीनुसार दिली जाणारी बक्षिसी नाही, उच्च न्यायालय; सशस्त्र दल जवानांच्या अंपगत्व निवृत्तीवेतनावर शिक्कामोर्तब

मधुमेह, उच्च रक्तदाब, स्पॉन्डिलायटिस आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांनी ग्रस्त लष्कर व नौदलाच्या कर्मचाऱ्यांना अपंगत्व निवृत्ती वेतन मंजूर करण्याचा मुंबईस्थित सशस्त्र…

ashm hypersonic glide missile
LR-AShM Missile: १५ मिनिटांत १५०० किमी अंतर कापत शत्रूच्या युद्धनौकांना टिपणारे ‘अश्म’ क्षेपणास्त्र काय आहे ?

समुद्रात १५०० किमी दूरवर असलेल्या शत्रूच्या युद्धनौकांना तसेच जहाजांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता अश्म क्षेपणास्त्रात आहे.

INSV Kaundinya Departs for Muscat
‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ मस्कतला रवाना; नौकेद्वारे प्राचीन वारशाचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न

नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या हस्ते नौका औपचारिकपणे दौऱ्यावर रवाना झाली. ओमानचे राजदूत इस्सा सालेह अल…

 Aatmanirbhar Indian Navy statement by former Navy chief R Hari Kumar
Indian Navy : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नौदलाची वाटचाल; माजी नौदल प्रमुखांनी मांडला नौदल प्रगतीचा आढावा

सागरी क्षेत्र, नौदलाचे कार्य आणि ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत आत्मनिर्भर नौदलाकडे झालेली वाटचाल यावेळी हरी कुमार यांनी सविस्तरपणे मांडली.

Indian-Navy-Helicopter
Indian Navy Helicopters: अमेरिकेने ओसामा बिन लादेनवरील कारवाईसाठी वापरलेली अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलात; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? प्रीमियम स्टोरी

Indian Navy Helicopters: कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार करण्यासाठी अमेरिकेने आखलेल्या ऑपरेशन नेपच्युनमध्ये सहभागी हेलिकॉप्टरची अत्याधुनिक आवृत्ती आता…

INS Vikrant 37-foot long replica created in Ratnagiri
तब्बल ३७ फुट लांबीचे आयएनएस विक्रांतचे बनवले मॉडेल, रत्नागिरीतील मयूर वाडेकरने साकारली प्रतिकृती

हे मॉडेल रत्नागिरीतून विशाखापट्टनम मार्गे कोलकाता येथे रवाना करण्यात आले असून, हे मॉडेल कोलकाता शिपयार्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.

'Operation Sindoor' Shows Indian Navy's Readiness - Admiral Tripathi
‘पहलगाम’नंतर पाकिस्तानच्या नौदलाला बंदरातच कसे रोखले? नौदलप्रमुखांनी दिली माहिती… फ्रीमियम स्टोरी

भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचे नौदल त्यांच्या बंदरातच रोखले; भविष्यातील युद्धात माहितीप्रभुत्व, स्वायत्त तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर नौदल महत्त्वाचे ठरेल, असे…

Pakistan is getting Hangor Class submarines from China India navy tension
पाक नौदलाला चीन देणार नव्या पाणबुड्या; पाकिस्तानच्या तुलनेत भारताची ताकद किती?

Pakistan China submarine deal हिंदी महासागराच्या उत्तरेकडील सामरिक क्षेत्रांमध्ये भारतीय नौदलाने आपला प्रभाव वाढवला आहे. परंतु, आता पाकिस्तानला त्यांची समुद्री…

india military chief leadership veterans meet defence symposium strategy innovation techfest iit mumbai
ऐतिहासिक क्षण! भारताचे लष्करी नेतृत्व टेकफेस्टमध्ये एकत्र येणार…

IIT Bombay Techfest Defence : आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ मध्ये आयोजित ‘डिफेन्स सिम्पोजियम २.०’ या कार्यक्रमात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ…

Indian Navy Vice Admiral Anil Jaggi Appointed NDA Commandant National Defence Academy Maharashtra Naval pune
NDA Commandant : एनडीएच्या प्रमुखपदी नौदलातील अधिकाऱ्याची नियुक्ती… कोण आहेत व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी?

Vice Admiral Anil Jaggi : व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी…

Fujian-China
Chinese Navy Fujian: फुजियान- चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका भारतासाठी ठरणार डोकेदुखी? प्रीमियम स्टोरी

Chinese Navy Fujian: फुजियान ही तिसरी विमानवाहू युद्धनौका अलीकडेच समारंभपूर्वक चिनी नौदलात दाखल झाली. तिचा नौदलातील प्रवेश हा भारतासाठी मात्र…

1965 Indo Pak War
India Pakistan War: द्वारकेवरील हल्ल्यामुळेच भारतीय नौसैनिकांना संताप आणि पाकिस्तानी युद्धनौकांना मिळाली जलसमाधी! प्रीमियम स्टोरी

Operation Trishul 2025 Indian Navy: व्हाइस अॅडमिरल एन. कृष्णन यांनी पाकिस्तानच्या या हल्ल्याचे वर्णन भारताच्या राष्ट्रीय सन्मानाला धक्का असे केले…

ताज्या बातम्या