scorecardresearch

भारतीय रिपब्लिकन पार्टी

भारतीय रिपब्लिकन पक्ष किंवा भारिप (Republican Party of India) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे सध्या अनेक गट आहेत. ज्यात रामदास आठवले (Ramdas Athawale) व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे भारिप (आ) व भारिप बहुजन महासंघ हे गट प्रमुख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” बरखास्त करून “भारतीय रिपब्लिकन पक्ष” स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे १९५९ पर्यंतचे मजबुत संघटन फार काळ टिकले नाही.

सर्वप्रथम भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उदय झाला व नंतर बहुजन महासंघ उदयास आला. या दोन्हीही संघटनांचा उदय व विकास ॲंड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे.
Read More
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले… प्रीमियम स्टोरी

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत रामदास आठवलेंनी सूचक विधान केलं आहे.

union minister ramdas athawale likely to contest ls poll shirdi constituency
सातारा: रिपब्लिकन पार्टीची फार राजकीय चर्चा होत नाही; रामदास आठवलेंची खंत

महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची ज्याप्रमाणे चर्चा होते, तशी आरपीआयची चर्चा होत नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री रामदास आठवले…

udayan raje bhosle poetry on ramdas athawale
रामदास आठवलेंसाठी उदयनराजेंची हटक्या शैलीत खास कविता, व्यासपीठावर पिकला एकच हशा

इतरांसाठी कविता करणाऱ्या रामदास आठवलेंसाठी उदयनराजेंनी हटक्या शैलीत खास कविता सादर केली आहे.

seema haider rpi ramdas athawale
Video: सीमा हैदर खरंच करणार ‘रिपब्लिकन पार्टीत’ प्रवेश? रामदास आठवले म्हणतात…

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मासूम किशोर यांनी सीमा हैदरला रिपाइंमध्ये घेणार असल्याचं विधान केल्यामुळे चर्चेला उधाण आलं!

ramdas athawale contest loksabha poll shirdi
रामदास आठवलेंचे ठरलंय, इथून लढणार लोकसभा… २८ मेच्या अधिवेशनात करणार घोषणा

येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही अशोक नागदिवे यांनी दिला.

ramdas athawale
Video: रामदास आठवलेंना व्हायचं होतं मोठा अभिनेता! म्हणाले, “मोकळा वेळ मिळाला तर एखादा चित्रपट…!”

रामदास आठवले म्हणतात, “माझी पत्नी ब्राह्मण आहे. तिचे अनेक नातेवाईक आमच्या घरी येत असतात. पण….!”

ramdas athawle rpi
Video: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रामदास आठवलेंना हवंय एक मंत्रीपद आणि…

रामदास आठवलेंचं मंत्रीपदाबाबत मोठं विधान, उत्तर प्रदेशमध्येही भाजपाकडे केली ३ ते ४ जागांची मागणी!

ramdas athavle
Video: रामदास आठवलेंना ‘या’ मतदारसंघातून लढवायचीये लोकसभा निवडणूक; म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांना…!”

रामदास आठवले म्हणतात, “मला युपीएच्या काळात मंत्रीपद नव्हतं दिलं. त्यांनी आरपीआयला सत्तेत सहभागी करून घ्यायला हवं होतं. पण सोनिया गांधी,…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×