क्रिकेटच्या पटलावर हे नाव वाचून आश्चर्य वाटणं साहजिक आहे. मात्र पात्रता फेरीचे अडथळे पार करून इटलीने टी२० वर्ल्डकपमध्ये रीतसर प्रवेश केला आहे. फुटबॉलविश्वात इटलीचा संघ अव्वल संघांपैकी एक मानला जातो. वर्ल्डकपच्या व्यासपीठावर त्यांचं पदार्पण कसं होतं हे पाहणं चाहत्यांसाठी अनोखा अनुभव असणार आहे. इटलीच्या वाटचालीत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जो बर्न्सचा वाटा मोलाचा आहे मात्र वर्ल्डकपसाठीच्या संघात त्याची निवड होऊ शकली नाही. ४२ वर्षीय वेन मॅडसेनकडे इटलीचं नेतृत्व आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जे जे स्मूट्स आता इटलीकडून खेळणार आहे. त्याचा अनुभव इटलीसाठी मोलाचा आहे. ग्रँट स्टुअर्ट इंग्लंडमधल्या काऊंटी क्रिकेटमध्ये सातत्याने खेळतो.