scorecardresearch

जोफ्रा आर्चर

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा इंग्लंडच्या क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला. त्याचे वडील ब्रिटीश आहेत. २०१५ मध्ये जोफ्राने वडिलांच्या मदतीने ब्रिटीश नागरिकत्त्व मिळवलं. त्याला लहानपणापासून क्रिकेटचे वेड आहे. याच वेडापायी तो इंग्लंडला वास्तव्याला आला. लगेचच २०१६ मध्ये जोफ्राने कंट्री क्रिकेट खेळायला सुरुवात केली. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याला अधिक यश मिळाले. बिग बॉश, आयपीएलसह अनेक फेन्चायझी क्रिकेट लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. मे २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे ऑगस्ट २०१९ मध्ये तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा सदस्य बनला. त्याआधी २०१८ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. उत्कृष्ट खेळ पाहून राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामील केले. या संघाच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी त्याने पेलावली.

२०२० पर्यंत तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात मौल्यवान खेळाडू बनला. पुढे २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. पण दुखापतीच्या कारणामुळे त्याला या हंगामातील एकही सामना खेळणे शक्य झाले नाही. यंदाच्या आयपीएल २०२३ मध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये जोफ्रा आर्चरला मुंबईच्या संघाच्या गोलंदाजीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
Read More
It is difficult for Archer to play in IPL England Board advised to stay away from the tournament know the reason
आर्चरला IPL २०२४मध्ये खेळणे कठीण, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

२०२२च्या आयपीएलपूर्वी आर्चरला मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु फ्रँचायझीने त्याला गेल्या आठवड्यात सोडले आहे. १९ डिसेंबर…

Jofra Archer Out Of World Cup Squad,
ODI World Cup 2023 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू संघातून झाला बाहेर

Luke Wright Reveals England Team: इंग्लंडचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मोठा धक्का बसला आहे. तो २०२३ च्या विश्वचषकासाठी इंग्लंडच्या…

Jofra Archer recovers from injury
ODI WC 2023: विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला तंदुरुस्त

ODI World Cup 2023: ससेक्सचे प्रमुख पॉल फारब्रेस यांनी आशा व्यक्त केली आहे की, आर्चर आगामी विश्वचषक २०२३ पूर्वी इंग्लंड…

Sunil Gavaskar advises Mumbai Indians
IPL 2023: “मुंबई इंडियन्सने ‘या’ खेळाडूला एक रुपयाही देऊ नये”, सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य

Mumbai Indians: सुनील गावसकर यांनी आयपीएलमधील फ्रँचायझीना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, खेळाडू कितीही मोठा किंवा प्रतिभावंच…

Jofra Archer Elbow Injury
ENG vs AUS: मुंबई इंडियन्स पाठोपाठ इंग्लंड संघाला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून ‘हा’ खेळाडू बाहेर

Ashes Series 2023: इंग्लंडला जूनमध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये त्यांना आपल्या प्रमुख गोलंदाजाशिवाय मैदानात उतरावे लागणार…

IPL 2023 MI vs CSK Match Updates
IPL 2023 MI vs CSK: चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाला मोठा धक्का; ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाज महत्त्वाच्या सामन्याला मुकणार?

MI vs CSK Match Updates: आयपीएल २०२३ च्या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे संघाच्या प्रमुख वेगवान…

संबंधित बातम्या