scorecardresearch

कर्नाटक निवडणूक

कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी होत आहे. कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८०हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे. या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील. १३२० मतदान केंद्र पूर्णपणे महिलांकडून सांभाळली जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली. कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी आणि निकाल १३ मे रोजी लागणार आहे.

कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या २२२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी बहुमतापासून त्यांना दूर राहावे लागले. काँग्रेसने ७८ तर जेडीएसने ३७ जागा मिळवल्या होत्या. तर बहुजन समाज पक्ष १, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे इतर उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा आकडा ११२ असल्यामुळे २०१८ साली विधानसभा त्रिशंकू झाली होती.

येडियुरप्पा यांनी सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे त्यांचे सरकार गडगडले. त्यानंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) संयुक्त सरकार सत्तेत आले. पण काँग्रेस व जनता दलाचे आमदार २०१९ साली फुटल्याने एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार १४ महिन्यांतच कोसळले. त्यानंतर पुन्हा येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. जुलै २०२१ मध्ये येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून भाजपने मूळ जनता दलातून आलेल्या बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली.

कर्नाटक विधानसभेच्या मागच्या काही निवडणुकांचा कल पाहिला तर कोणत्याही पक्षाला आपल्या सलग दोन निवडणुकीत बहुमत मिळवता आलेले नाही. २००८ साली भाजपाने ११० जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. तर २०१३ साली काँग्रेसने १२२ जागा जिंकून सरकार स्थापन केले. त्यानंतर पुन्हा २०१८ साली सुरुवातीला भाजपा, त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आणि त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे यंदा २०२३ साली कुणाचे सरकार स्थापन होणार, हे पाहण्यासाठी १३ मे ची वाट पाहावी लागेल.
Read More
Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी

भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

Kiran Mazumdar-Shaw Electoral Bonds Data
तुम्हालाही पैसे मागितलेले? राजकीय पक्षांना कोट्यवधींचं दान देणाऱ्या उद्योजिकेचं थेट उत्तर, म्हणाल्या…

EC Shares Electoral Bonds Data : निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या पहिल्या ३० कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या अशा आहेत…

siddhramaiya shivkumar
Loksabha Election: कर्नाटक काँग्रेससमोर भाजपा-जेडीएस युतीचे आव्हान, सिद्धरामय्या-शिवकुमार यांची जोडी निवडणुकीसाठी तयार

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांना खूश ठेवण्यात सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Karnataka Jds bjp member in rajyasabha
Rajyasabha Election : कर्नाटकात कुपेंद्र रेड्डी निवडणूक रिंगणात; क्रॉस व्होटिंगची शक्यता; काँग्रेसपुढे मोठे आव्हान

जेडी(एस)-भाजपा युतीने डी. कुपेंद्र रेड्डी रिंगणात उतरवले आहे. जेडी(एस)-भाजपा युतीचा पाचवा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत आला…

BJP-JD(S) seat sharing
भाजपा-जेडी(एस) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, कुमारस्वामी चिक्कबल्लापूरमधून लढण्याची शक्यता, गौडांबाबत अस्पष्टता

कुमारस्वामी यांचा आणखी एका जागेवर विचार केला जात आहे, तो म्हणजे मंड्या मतदारसंघ आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी १७ जानेवारी रोजी दिल्लीत…

jagdish shettar returns to bjp marathi news, jagdish shettar rejoins bjp marathi news
Karnataka : जगदीश शेट्टर यांची भाजपात ‘घरवापसी’, आठ महिन्यांतच काँग्रेसला सोडचिट्ठी

माजी मुख्यमंत्री शेट्टर यांना काँग्रेसने २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकिट दिले. परंतु, शेट्टर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.

New-Lop-of-Karnataka-vidhan-sabha
मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद; येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा

विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर भाजपाने विरोधी पक्षनेतेपदी नेत्याची निवड केली आहे. यातून येडियुरप्पा यांच्या गटाचे सामर्थ्य पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये…

Siddaramaiah-on-PM-modi-jibe.
‘मोदींनी जिथे प्रचार केला, तिथे भाजपाचा पराभव झाला’, पंतप्रधान मोदींच्या विधानावर सिद्धरामय्यांचा पलटवार

कर्नाटकच्या निकालामुळे भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व हताश झालेले आहे. त्यामुळेच त्यांनी अद्याप विरोधी पक्षनेत्याचीही निवड केलेली नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या…

Sasikanth Senthil and Lokesh Sharma
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय सुलभ करणाऱ्या शशिकांत सेंथिल यांच्याकडे राजस्थानच्या प्रचाराची धुरा

राजस्थानमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी…

HD Deve Gowda
जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि भाजपाची २०२४ साठी युती; येडियुरप्पा यांच्याकडून सुतोवाच

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातील सूत्रांनी सांगितले की, पक्ष उघड युती करण्याऐवजी अंतर्गत युती करण्यासाठी इच्छुक आहे. पण, तरीही ही चर्चा…

narendra modi and amit shah
कर्नाटकमध्ये भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर; बी. एल. संतोष यांच्या बैठकीला बडे नेते गैरहजर! प्रीमियम स्टोरी

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

Telangana Congress committee Assembly Election
कर्नाटकानंतर तेलंगणात विजय मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न; जाहीरनाम्यात घर, पेन्शन, कर्जमाफीचे आश्वासने दिली जाणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने आता तेलंगणावर लक्ष दिले आहे. कर्नाटकप्रमाणेच जनतेला विविध आश्वासने देण्यासाठी लोकांच्या अपेक्षा काय आहेत?…

संबंधित बातम्या