डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत.
व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते.
भाजपाचे नेते किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पत्रकारांवर गुन्हे दाखल झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार…