scorecardresearch

कोयना धरण

महाराष्ट्राची भाग्यदायिनी असे कोयना नदीला म्हटले जाते. या नदीवर कोयना धरण बांधलेले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणाचे बांधकाम १९५६ मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी १९६४ मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. या जलाशयाच्या काठावर कोयना अभयारण्य आहे. या धरणाची उंची १०३.२ मी (३३९ फूट) तर लांबी ८०७.२ मी (२,६४८ फूट) इतकी आहे. या धरणाचा वापर सिंचन आणि वीज निर्मिती यांसाठी केला जातो. २७९७.४ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाची वीज निर्माण करण्याची क्षमता १,९२० मेगाव्हॉट इतकी आहे. १९६९ मध्ये झालेल्या कोयनानगर भूकंपाने या धरणाला काही भेगा पडल्या होत्या. तेव्हा झालेले नुकसान भरुन काढण्यात आले. १९७३ मध्ये धरणाचा ओव्हरफ्लो नसलेला भाग तयार करण्यात आला. त्यानंतर २००६ मध्ये स्पिलवे विभाग मजबूत करण्यात आला. आता हे धरण भविष्यामध्ये १९६९ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपजन्य परिस्थितीचा सामना करु शकते असे म्हटले जाते.Read More

कोयना धरण News

Dams, almatti dam, height, back water, flood, sludge
धरणांच्या उंची-वाढीवर बंदीच हवी…

गाळ काढून जलाशयांची खोली वाढवण्याचा उपाय पुरेसा सिद्ध झालेला असूनही अलमट्टी धरणाची उंची वाढवणे हे नुकसानकारच ठरणारे आहे…

india-on-dam
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कोयना धरणावर लेसरद्वारे दृश्ये

रात्रीच्या अंधारात ही दृश्ये अतिशय खुलून दिसत आहेत आणि याची चित्रफित कोयना धरण प्रशासनाने समाज माध्यमांवर प्रदर्शित केली आहेत.

कोयनेतून उसासाठी पाणीबंदीचे नियोजन

कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाच्या हंगामापर्यंत पुरविण्यासाठी उसासारख्या बारमाही पिकाला पाणीच न देण्याचे जलसिंचन विभागाचे नियोजन सुरू आहे.

कोयना प्रकल्पाचे संस्मरणीय शब्दचित्र

महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प हे महाराष्ट्राचे एक भूषण! प्रत्येकजण त्याच्याविषयी अभिमानाने बोलतो. त्याचे अतिविशाल रूप नजरेत साठवून घ्यायला आवर्जून जातो.

कृष्णा, कोयनाकाठी जोमदार पाऊस; कोयना धरणाचा पाणीसाठा ३२ टक्के

कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी काल गुरुवारी उष्म्याचा कहर राहताना, सायंकाळी नंतर ढग दाटून आले. तर मध्यरात्री कोसळलेल्या…

कोयना : अभियांत्रिकी चमत्काराचा हीरक महोत्सव प्रकाशलक्ष्मी कोयना

दिवाळी २०१४ कोयना विद्युत प्रकल्पाचा उल्लेख नेहमीच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असा केला जातो. १९६२ साली प्रथम वीजनिर्मिती सुरू झालेला हा प्रकल्प…

पाऊस अगदीच ओसरल्याने ‘कोयने’तून विसर्ग पूर्णत: बंद

पावसाचा जोर अगदीच ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवकही घटल्याने धरणातून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने कमी करत तो…

कोयना धरण भरले

महाराष्ट्रासाठी जीवनदायी असणारे कोयना धरण शनिवारी पहाटे पूर्ण भरले. आज सकाळी ७ वाजल्यापासून धरणातून १६,२४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात…

वारणेचा साठा १०० टक्क्य़ांवर तर कोयनेचा १०० टीएमसीवर

वारणा धरण १०० टक्के भरले असून कोयना धरणातील पाणीसाठा १०० टीएमसीवर बुधवारी पोहोचला. वारणा धरणातून प्रतिसेकंदाला १२ हजार ६६१ क्युसेक्स…

‘कोयने’ची निळाई

कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो? मग युरोपियन लेक डेस्टीनेशन माहितीच असेल ना? चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले सुंदर छोटे-मोठे तलाव, स्वच्छ नितळ…

कोयना धरणाचा पाणीसाठा १५ टक्के; नव्या तांत्रिक वर्षांत पावसाची नोंद नाही

कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी आज सोमवारी उष्म्याचा कहर राहताना, दुपारनंतर ढग दाटून आलेल्या वातावरणात जोरदार पावसाची अपेक्षा…

वरदायिनी कोयनेतून उमटणार ‘लक्ष्मीची पावले’

महाराष्ट्राला विजेची वरदायिनी ठरलेल्या कोयना प्रकल्पातून सागराला मिळून वाया जाणाऱ्या पाण्याचा सुयोग्य उपयोग करून ते ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ वेगवेगळ्या मार्गाने

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.