लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद (Aurangabad) विभागातील एक जिल्हा आहे. लातूर (Latur)हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो.
१९ व्या शतकात लातूर हैदराबाद संस्थानमध्ये आला. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.Read More
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना सोयाबीनचे तेल पुरविले जात असताना राज्यातील ‘आनंदाचा शिधा’मध्ये मात्र आयात केलेले पामतेल दिले जाणार…
बनसोडे हे नवखे असतानाही त्यांनी कोलांटउड्या मारून मिळवलेल्या मंत्रिपदामुळे लातूरच्या अमित देशमुख यांना त्यांचे मंत्रीपद चांगले झोंबले असून बनसोडेवर देशमुख…