महाराष्ट्र सरकार

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका

उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.

'लाडकी बहीण' सारख्या योजना कोणकोणत्या राज्यांनी सुरू केल्या आहेत? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Money Schemes For Women : ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना कोणकोणत्या राज्यांनी सुरू केल्या आहेत? प्रीमियम स्टोरी

Government Money Schemes For Women : निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत. ‘लाडकी बहीण’…

poverty alleviation in Maharashtra
महाराष्ट्रातील दारिद्र्य निर्मूलनाचे आव्हान

‘शाश्वत विकास ध्येयां’पैकी दारिद्र्य निर्मूलन हे महत्त्वाचे ध्येय. राज्यातील विकासाची चर्चा विभागीय असमतोलावर घुटमळते, पण दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित आकडेवारी सांगते…

Nagpur vidhan sabha
देणी लाखभर पैसे दिले टिचभर, बांधकाम खात्याचे काम कसे चालणार ?

शासनाच्या माध्यमातून रस्ते, पूल, विविध कार्यालयांच्या इमारतींसह तत्सम कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून केली जातात.

विश्लेषण : माहिती अधिकार कायदा लालफीतशाहीत अडकला आहे का? (प्रातिनिधीक छायाचित्र)
विश्लेषण : माहिती अधिकार कायदा लालफीतशाहीत अडकला आहे का?

माहिती अधिकार हा एकमेव कायदा जनतेच्या बाजूने आहे. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून अनेक अपिले सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी माहितीसाठी अपील…

सुरक्षित घरे, मदतीसाठी हेल्पलाइन, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारची योजना काय? (फोटो सौजन्य @freepik)
सुरक्षित घरे, मदतीसाठी हेल्पलाइन, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारची योजना काय?

inter caste married couples : गेल्या काही दिवसांपासून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर हल्ले होण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे.

Shiv Sena Thackeray group leader Sushma Andhare criticized Chief Minister Devendra Fadnavis
Sushma Andhare: संजय राठोड, शिरसाटांच्यावर मंत्रिपदावरून अंधारेंची आगपाखड

Sushma Andhare Press Conference Live: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आज नागपुरात पार पडला. तत्पूर्वी काल १६ डिसेंबरला मंत्रिमंडळ…

Ministers profile
मंत्र्यांची ओळख : अँड. माणिक कोकाटे, संजय सावकारे, जयकुमार रावल, नरहरी झिरवळ

आज ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. भाजपाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी आज शपथ घेतली.

ministers profile Radhakrishna Vikhe-Patil Prakash Abitkar Chandrakant Patil Madhuri Misal Datta Bharane
मंत्र्यांची ओळख : राधाकृष्ण विखे- पाटील, प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्ता भरणे

आज ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. भाजपाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी आज शपथ घेतली.

संबंधित बातम्या