scorecardresearch

महाराष्ट्रातील पावसाळा

महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रमुख ऋतु पाहायला मिळतात. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या राज्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. अरबी समुद्रावरुन हे वारे प्रामुख्याने वाहत असतात. तर काही वेळेस ते केरळ – कर्नाटक राज्यांमधून पुढे पुढे येऊ शकतात. महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. याच्या किनारपट्टीलगतच गुजरातपासून सुरु झालेली सह्याद्री पर्वतरांग आढळते. सह्याद्री पर्वतांमुळे हे र्नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात. परिणामी कोकण, पुणे आणि नाशिक या प्रशासकीय विभागांमधील जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते. या भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नद्यांची उगमस्थाने देखील आहेत. परंतु या भौगोलिक रचनेमुळे अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळते. Read More
mahabaleshwar and jor in satara recorded highest rainfall
साताऱ्यातील महाबळेश्वर व जोर येथे विक्रमी पावसाची नोंद; पावसाची संततधार सुरूच

जोरदार वारे, पाऊस, धुके आणि गारठ्याने महाबळेश्वर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Reverse Waterfall Video
Video: पाण्यात जात नाहीत, तरीही भिजतात पर्यटक! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे ‘Reverse Waterfall’, कारण…

महाराष्ट्रालाही अनेक सुंदर धबधब्यांनी विळखा घातला असून पावसाळी हंगामात पर्यटकांना निसर्गाचं नयनरम्य दृष्य पाहायला मिळतं.

Seasonal winds in Arabian ocean
मोसमी पाऊस दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल

बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांवर गेल्या अकरा दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या मोसमी पावसाने वाऱ्यांच्या वेगासह अंदमान बेटांना व्यापून मध्य पूर्व बंगालच्या…

unseasonal rain loss
यवतमाळलाही ‘अवकाळी’चा तडाखा, पिकांचे प्रचंड नुकसान; कृषी महोत्सवात चिंतेचे ढग

कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

unseasonal rain
गोंदियात वादळी वाऱ्यासह पाऊस, वीज पुरवठा काही काळ खंडित, पिकांचे नुकसान

आज सकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

mumbai rain
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, मेघगर्जनेसह पाऊस, गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा!

आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

rain in various parts of the maharashtra
पुण्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी ; उदयाही पावसाची शक्यता

मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल, असे हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजात नमुद करण्यात आले आहे.

Unseasonal Rains
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडीचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह परिसरातील कमाल तापमानात ५ अंशाने वाढ झाली. मात्र सोमवारपासून पुन्हा तापमानात हळूहळू घट होऊन…

dams in maharashtra accumulated record water storage due to prolonged monsoon
राज्यातील धरणे काठोकाठ ; लांबलेल्या पावसाने पाणीसाठा विक्रमी; सर्वच भागांत सुखद स्थिती

गेल्या दोन वर्षांतही पाऊस लांबला असला, तरी या वर्षीच्या तुलनेतही यंदा धरणांतील पाणीसाठा अधिक आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×