scorecardresearch

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.


यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


Read More
Bihar Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० हजार कोटींच्या प्रकल्पांचे अनावरण, मोदी सरकारची बिहार रणनीती

PM in Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहार भेटीदरम्यान केवळ निवडणुकीच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित केलेले नाही. बिहार राज्याचे रूपांतर करण्यासाठी विविध…

x Indira Gandhi Fixed Elections BJP Nishikant Dubey Hit Back Rahul Gandhi
“इंदिरा गांधींनी निवडणुका फिक्स केल्या होत्या”; भाजपा खासदार असे का म्हणाले?

Nishikant Dubey on Rahul Gandhi भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली.

Rahul Gandhi
“२००९ मध्ये पाच महिन्यांत ३० लाख मतदार वाढलेले, तेव्हा…”, महसूल मंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगन्मताने बोगस मतदारांनी मतदारयादी फुगवल्याच्या आरोपावर…

Election Commission denies Rahul Gandhi's Maharashtra poll allegations, terms them absurd
Rahul Gandhi: “राहुल गांधींचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतचे आरोप हास्यास्पद”, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Rahul Gandhi LoP: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दावा केला की, गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात घोटाळा? राहुल गांधींच्या आरोपांत कितपत तथ्य? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत खरंच घोटाळा झालाय का?

Rahul Gandhi on Maharashtra Election : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत खरंच घोटाळा झाला आहे…

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : “जग मतपत्रिकेवर परतलं, तरी आपण…”, खरगेंची मोदी सरकारवर टीका; महाराष्ट्राच्या निवडणुकीचा दाखला देत म्हणाले…

Mallikarjun Kharge on EVM : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरादर हल्लाबोल केला.

narendra maharaj on mahayuti victory
Narendra Maharaj : “महाराष्ट्रात महायुतीचा विजय साधू-संत, संघामुळेच”, नरेंद्र महाराजांचं विधान चर्चेत; म्हणाले, “अजित पवारांनाही खात्री नव्हती”! फ्रीमियम स्टोरी

नरेंद्र महाराज म्हणतात, “एकनाथ शिंदेंना वाटतंय लाडकी बहीण योजनेमुळे विजय मिळाला, पण तसं मुळीच नाहीये”!

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांचा कार्यकाळ कसा राहिला? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
CEC Rajiv Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांचा कार्यकाळ कसा राहिला?

CEC Rajiv Kumar tenure : २०१९ मध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर वाद आणि टीका सुरू असताना राजीव कुमार निवडणूक आयोगात सामील…

Congress party gears up for the Bihar assembly elections following defeats in three state elections.
Bihar Election: चार महिन्यांत तीन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव, आता बिहारच्या आव्हानासाठी काँग्रेसने सुरू केली तयारी

Bihar Election 2025: गेल्या चार महिन्यात देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यातील सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली…

rahul gandhi on maharashtra assembly election results 2024
Video: “महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे?” राहुल गांधींनी मांडलं गणित; उपस्थित केले ‘हे’ तीन मुद्दे!

राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत तीन मोठे दावे केले असून निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांबाबत मागणी केली आहे.

Image Of Jitendra Awhad
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘स्कॅम”, राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप

Jitendra Awhad : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संबंधित बातम्या