महाविकास आघाडी News

२०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांप्रमाणे समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष अशा काही पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन त्यांची २५ वर्षांची युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसामध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar)बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुढे त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्ष टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Read More
Eknath shinde devendra fadnavis assembly session
Eknath Shinde : “तुमचा तुरुंगात पाठवायचा चौथा नंबर होता”, विधानसभेत एकनाथ शिंदे फडणवीसांना काय म्हणाले?

Eknath Shinde in Assembly Session : मुख्यमंत्री शिंदे विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंचा उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही…

Mahayuti muslim mlas in Maharashtra vidhansabha
“महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही”, समाजवादी पार्टीचं मविआ नेत्यांना पत्र, एमआयएमचा उल्लेख करत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे मिर्झा वजाहत हे विधान परिषदेतील दोन मुस्लिम आमदार निवृत्त होत असल्यामुळे विधान परिषदेतील मुस्लिम…

Ambadas Danve
मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडी अनुपस्थित का? अंबादास दानवेंनी सांगितले कारण; म्हणाले…

महाविकास आघाडीने मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती…

MLA Sanjay Shirsat On Milind Narvekar
विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून संजय शिरसाटांचा नार्वेकरांना इशारा; म्हणाले, “लक्ष ठेवा, अन्यथा…”

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मिलिंद नार्वेकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

Bhagwat Karad on chandrakant Khaire
“विधानसभेपूर्वी भूंकप होणार, चंद्रकांत खैरेंसह १० जण इच्छुक, मला चार जणांचे फोन आले”, भाजपा नेत्याचा मोठा दावा प्रीमियम स्टोरी

विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे धमाके पाहायला मिळतील, असा दावा माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे.

Anil Patil on Congress
“काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी…”, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे.

maha vikas aghadi agree to share seat for small parties in assembly elections zws 70
विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने आशा पल्लवित झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.

Against Indrayani river pollution Indrayani rescue Elgar movement on behalf of Pimpri Chinchwad city Mahavikas Aghadi today along Indrayani river
आळंदी: महाविकास आघाडीच इंद्रायणी बचाव एल्गार; दिला ‘भाजप हटाव, इंद्रायणी बचाव’ चा नारा..

इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विरोधात पिंपरी- चिंचवड शहर महाविकास आघाडीच्या वतीने आज इंद्रायणी नदीकाठी इंद्रायणी बचाव एल्गार आंदोलन करण्यात आले.

ताज्या बातम्या