Associate Partner
Granthm
Samsung

महाविकास आघाडी Videos

महाविकास आघाडीची स्थापना (MVA)२०१९ साली झाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात या आघाडीची स्थापना झाली होती. सध्या महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष आहे.

भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन २५ वर्षांची युती तुटली.


त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.


जित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुढे त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्ष टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


Read More
Workers of Shivsena Thackeray group raised strong opinions against NCP and Congress in Pune
Pimpari Chinchwad: विधानसभेच्या निमित्ताने आघाडीत पुन्हा बिघाडी? पिंपरीत काय घडतंय?

लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा धुसफूस, नाराजीचा सुर उमटू लागल्याचं…

MVAs joint press conference from Mumbai
MVA Press Conference Live: मुंबईतून मविआची संयुक्त पत्रकार परिषद Live | Mumbai

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. आता लोकसभेनंतर विधानसा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे.…

Navneet Ranas first reaction after defeat in loksabha election 2024
Navneet Rana on Uddhav Thackeray: पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याकडून परावभ झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी…

Shahu Maharaj Chhatrapati won Lok Sabha election from Kolhapur
Shahu Maharaj Chhatrapati: कोल्हापूरकरांचा शाहू महाराज छत्रपतींना कौल, प्रतिक्रिया देत म्हणाले…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीकडून ते लोकसभेच्या रिगंणात होते. लोकसभेचा निकाल पाहता एकाधिकारशाहीला…

Maharashtras trend towards Mahavikas Aghadi analysis by Girish Kuber editor of Loksatta
Exit Poll 2024 : महाराष्ट्रातला कल महाविकास आघाडीकडे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे विश्लेषण प्रीमियम स्टोरी

Exit Poll 2024 : जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार देशात येईल असं म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात महायुतीच्या…

Vaishali Darekars first reaction after voting loksabha election
Vaishali Darekar: वैशाली दरेकर यांची मतदानानंतर पहिली प्रतिक्रिया | Mumbai Voting

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवली पूर्वेतील प्रकाश विद्यालयातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. आता मशाल पेटणार असून यंदा…

Shindes name and Thackerays Chief Ministership Sharad Pawar disclosed
Sharad Pawar: शरद पवारांनी केला खुलासा; सांगितला ‘तो’ प्रसंग | Loksatta Loksamvad प्रीमियम स्टोरी

२०१९मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. तेव्हा एकमताने उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आलं. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत…

ताज्या बातम्या