scorecardresearch

मल्लिकार्जुन खरगे News

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.


२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.


जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले.


Read More
Rahul Gandhi Mallikarjun Kharge meet Chief Justice Surya Kant Election Commission controversy | देशात 'अघोषित आणीबाणी'; राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उद्या सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या भेटीला
Video: “देशात अघोषित आणीबाणी…”, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना भेटणार!

देशातील लोकशाहीची सद्यस्थिती आणि निवडणूक आयोगातील गैरप्रकारांबाबत निवेदन सादर करून लोकशाहीच्या रक्षणासाठी विनंती करणार असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले.

Aradhana Misra Mona and Imran Masood Appointed as part of congress brahman-muslim equation
UP Congress : काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! ‘ब्राह्मण-मुस्लिम’ समीकरण साधत उत्तर प्रदेशात पुन्हा पाय रोवणार? प्रीमियम स्टोरी

UP Congress Politics : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यात मोठा संघटनात्मक फेरबदल केला आहे. आमदार आराधना मिश्रा ‘मोना’…

INDIA Bloc Protest Election Commission
निवडणूक आयोगाविरोधात पाच मोठ्या आंदोलनाची घोषणा; ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगावर मोर्चा, खरगेंनी सांगितली रणनीती

सर्व विरोधी पक्षाचे नेते आणि खासदार निवडणूक आयोगावर ६ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार आहेत, अशी घोषणा मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Mallikarjun Kharge Gyanesh Kumar Puppet Row news update | Election Commission SIR Controversy Marathi News analysis | मल्लिकार्जुन खरगे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाद | केंद्रीय निवडणूक आयोग मतदार यादी विवाद ताज्या घडामोडी
“मुख्य निवडणूक आयुक्त सरकारच्या हातचे बाहुले”; मल्लिकार्जुन खरगे आक्रमक, ५ मोठ्या मागण्यांसह राजीनाम्याची मागणी!

Mallikarjun Kharge Gyanesh Kumar Puppet Row update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे केंद्र सरकारचे “पपेट” (कठपुतळी) बनले आहेत, असा…

Congress State Incharge Reshuffle
काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय; ६ राज्यांचे प्रभारी बदलले, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी ‘या’ बड्या नेत्याची वर्णी

काँग्रेस हायकमांडने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. ६ राज्यांचे प्रभारी बदलले आहेत.

Mallikarjun Kharge Haldwani Vyaspeeth Shuddhikaran issue | Uttarakhand FIR demand JP Nadda letter
‘शुद्धीकरण’प्रकरणी एफआयआरचे निर्देश द्या! मल्लिकार्जुन खरगे यांची जे. पी. नड्डांकडे पत्राद्वारे मागणी

‘‘जेव्हा राज्यसभेत ‘शुद्धीकरणाचा’ मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले होते की चौकशीनंतर दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई…

Members of BJP's SC wing in Uttarakhand perform the "buddhi shuddhi" yagna in Dehradun on Tuesday. (Express Photo)
‘राहुल गांधींना सद्बुद्धी मिळो’, म्हणत भाजपाने केला ‘बुद्धी शुद्धी’ यज्ञ, नवा वाद पेटण्याची चिन्हं

मल्लिकार्जुन खरगेंच्या हल्द्वानी येथील दौऱ्यानंतर शुद्धीकरण करण्यात आल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता राहुल गांधींना सद्बुद्धी मिळावी म्हणून उत्तराखंडमध्ये बुद्धी शुद्धी…

Mallikarjun Kharge Haldwani Shuddhikaran Havan site photo | Dalit rights constitutional equality article 17 visual explanation
‘शुद्धीकरणा’नंतरचा, ‘धर्मस्वातंत्र्या’चा प्रश्न! 

हलद्वानी येथे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर झालेल्या ‘शुद्धीकरण हवना’ची चौकशी हवीच; पण ज्या समानतेची हमी संविधानाने दिली, ती धर्मातून मिळते…

Rahul Gandhi Booked Haldwani FIR news photo | Mallikarjun Kharge Purification Row press conference image | राहुल गांधी एफआयआर हलद्वानी प्रकरण | मल्लिकार्जुन खर्गे शुद्धीकरण वाद उत्तराखंड
‘शुद्धीकरण’ प्रकरणात FIR ची मागणी भोवली? राहुल गांधींविरोधातच हलद्वानीत गुन्हा दाखल

Rahul Gandhi Booked Haldwani FIR updates : त्तराखंडमधील हलद्वानी येथील रामलीला मैदानावर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर पार पडलेल्या ‘शुद्धीकरण’ पूजेवरून…

Congress chief Mallikarjun Kharge addressed a rally in Haldwani on August 8
मल्लिकार्जुन खरगेंनी CWC च्या बैठकीत व्यक्त केली खंत, “शुद्धीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी निषेध नोंदवला नाही”

उत्तराखंड या ठिकाणी एका रॅलीमध्ये भाषण केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे जेव्हा निघून गेले तेव्हा तिथे काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी येऊन शुद्धीकरण केलं…

kharge
‘विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त’; काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत खरगेंची केंद्रावर टीका

केंद्रातील मोदी सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला.

ताज्या बातम्या