scorecardresearch

मेगा ब्लॉक

मुंबईची जीवनदायनी अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनचे मध्य, पश्चिम आणि हार्बर असे एकूण ३ प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. याशिवाय ठाणे ते वाशी या ट्रेनच्या मार्गाला ट्रान्स हार्बर असे म्हटले जाते. सकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास लोकल ट्रेनचा प्रवास सुरु होतो. ट्रेनच्या असंख्य फेऱ्या या रात्री १२.३० ते १ च्या दरम्यान थांबतात. तेव्हा रात्री १ ते सकाळी ४ या सुमारास ट्रेनचा प्रवास बंद असतो. या काळात रेल्वेची दुरुस्तीची कामे सुरु असतात. त्यात रुळाची देखभाल, सिग्नल तसेच अन्य तांत्रिक गोष्टींमध्ये बदल केले जातात. पण या कामांसाठी हा वेळ पुरेसा पडत नाही. त्यामुळे रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक लावून ही कामे चार ते पाच तासांमध्ये करण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचारी, अधिकारी करत असतात. त्यामुळे मेगा ब्लॉक हा लोकलसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो.


मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणत्या दिवशी किती तासांसाठी मेगा ब्लॉक होणार हे फार आधीपासून ठरवले जाते. एका रविवारच्या मेगा ब्लॉकसाठीची तयारी एक आठवडा आधीपासून केली जाते. गँगमन, कीमन, पॉइंट्समन हे कर्मचारी लोकलचे रुळ, सिग्नलचे पॉइंट्स, ओव्हरहेड वायर अशा असंख्य तांत्रिक गोष्टी तपासून घेतात. त्यात दोष आढळल्यास त्यांची नोंद करतात. या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी या भागांकडे पाठवल्या जातात. पुढे यातील प्रमुख विभागाकडून परिचालन विभागाला मेगा ब्लॉक घेण्यासाठीचे पत्र पाठवले जाते. हे पत्र तपासल्यावर परिचालन विभाग ब्लॉकची वेळ, गाड्यांचे वेळापत्रक वगैरे पाहून मेगा ब्लॉकचे वेळापत्रक ठरवतात. त्यानंतर हे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. शिवाय प्रवाशांनीही मेगा ब्लॉकची माहिती दिली जाते.


मेगा ब्लॉक (Mega Block) हे लोकसत्ता डॉट कॉमचे एक महत्त्वपूर्ण पेज आहे. या पेजवर मेगा ब्लॉक या विषयाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच वाचकांनी नव्या अपडेट्ससह येथे वाचायला मिळतील.


Read More
Railway megablock tomorrow Many trains departing from Pune have been cancelled
रेल्वेचा उद्या मेगाब्लॉक! पुण्यातून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान उद्या (ता.१०) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.

Mega Block Harbour Railway Line today Sunday
आज हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात…

mega block on western railway due to maintenance work
Mumbai Local Train Block : पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

24-hour block on Western Railway
मुंबई: पश्चिम रेल्वेवर ४, ५ नोव्हेंबर रोजी २४ तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील खार ते गोरेगाव दरम्यान ११ दिवसांचा ब्लॉक घेऊन सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे.

western railway 256 local trains cancelled on the first day
पश्चिम रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल; ब्लॉकच्या पहिल्या दिवशी २५६ लोकल फेऱ्या रद्द

ब्लॉक काळात २७ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबपर्यंत ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

mega block on trans harbour lines western railway on sunday
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, या दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

पश्चिम रेल्वेने वसई रोड – विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी…

undeclare mega block by railway on central line completely disrupted local train time table
मध्यरेल्वेनं गुरूवारी घेतला अघोषित ब्लॉक, वाहतूक कोलमडली; कारण काय? वाचा…

मध्य रेल्वेने अघोषित ब्लॉकची प्रत्येक स्थानकात घोषणा करावी. फक्त लोकल उशिराने धावत आहेत, असे न सांगता ब्लॉकची पूर्ण माहिती द्यावी.

mega block on central and western railway on sunday many local train cancel
मुंबई: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, अनेक लोकल गाड्या रद्द; ‘असा’ करा प्रवास

मध्य रेल्वेवरील अनेक लोकल आणि पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

29 days long block on western railway
२,७०० लोकल फेऱ्या रद्द, ४०० फेऱ्या अंशत: रद्द; पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेसाठी २९ दिवसांचा मोठा ब्लॉक

पुढील एक महिना प्रवाशांना लोकल प्रवास करताना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

central railway carry out midnight mega block for 5 day at panvel
हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा मेगा ब्लॉक, नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी पाच दिवसाचा वाहतूक ब्लॉक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत बेलापूर – पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×