scorecardresearch

मोहम्मद सिराज News

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म १३ मार्च १९९४ रोजी हैदराबादमध्ये एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये झाला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. परवडत नसतानाही त्यांनी महागडी क्रिकेट किट सिराजला आणून दिली. लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत मोहम्मद सिराजने प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. पुढे मित्राच्या मदतीने त्याने चार मिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायची संधी मिळाली. २०१५ मध्ये चारमिनार येथे झालेल्या सामन्यामध्ये त्याने भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. या क्रिकेट क्लबमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हैदराबादच्या संघात निवड करण्यात आली.


२०१५-१६ मध्ये मोहम्मद सिराजने रणजी स्पर्धेमध्ये पदार्पण केले. पुढे लगेचच त्याला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा खेळता आली. २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १८.९२ च्या सरासरीने ४१ बळी घेतले. तेव्हा हैदराबादसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. २०१७ च्या आयपीएलमध्ये त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २.६ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर्षी तो हैदराबादकडून काही सामने खेळला. पुढे २०१८ च्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात सामील केले. तो आरसीबीच्या प्रमुख गोलदांजांपैकी एक आहे.


२०१७ मध्ये सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये त्याने केन विल्यमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेत आपली क्षमता दाखवून दिली. २०१९ मध्ये एकदिवसीय, तर २०२० मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. सध्या भारतीय वेगवान गोलदाजांपैकी एक आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोनं करत गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये आपले स्थान मिळवले. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याची समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकामध्येही तो दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



Read More
Mohammed Siraj 20 Number Celebration of Jamie Smith Wicket Dedicate it to Late Portuguese Footballer Diogo Jota Video
IND vs ENG: मोहम्मद सिराजने जिंकली चाहत्यांची मनं, विकेटनंतर अनोख सेलिब्रेशन करत कोणाला समर्पित केली विकेट? पाहा VIDEO

Mohammed Siraj Celebration: मोहम्मद सिराजने दुसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतर जेमी स्मिथला झेलबाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पण सिराजने विकेटनंतर…

mohammed siraj
IND vs ENG: लाईव्ह सामन्यात राडा! सिराज- रूटमध्ये बाचाबाची; Video तुफान व्हायरल

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद सिराज आणि जो रूट यांच्यात…

mohammed siraj
IND vs ENG: ख्रिस वोक्सचा झेल घेतल्यानंतर मोहम्मद सिराजचं भन्नाट सेलिब्रेशन, Video एकदा पाहाच

Mohammed Siraj Celebration: प्रसिद्ध कृष्णाच्या दमदार बाऊंसरवर ख्रिस वोक्स बाद होऊन माघारी परतला. दरम्यान तो बाद झाल्यानंतर सिराजने हटके सेलिब्रेशन…

Mohammed Siraj Stunning One Hand Catch on Ravindra Jadeja Bowling video Goes Viral
IND vs ENG: ‘जॉन्टी’ सिराजचा डायव्हिंग झेल! हवेत उडत एका हाताने टिपला कॅच; मैदानावर बसून केलं भन्नाट सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

Mohammed Siraj Catch: मोहम्मद सिराजने हवेत उडी घेत हाताने झेल टिपत जोश टंगला आऊट केलं. सिराजचा झेल पाहून सगळ्यांनीच त्याचं…

Mohammed Siraj Statement on 6 Wicket Haul Against England in 2nd Test
IND vs ENG: “चांगली गोलंदाजी करूनही मला…”, मोहम्मद सिराजचं ६ विकेट्स घेतल्यानंतर मोठं वक्तव्य; इंग्लंडविरूद्ध कामगिरीनंतर पाहा काय म्हणाला?

Mohammed Siraj On 6 Wickets: एजबेस्टन कसोटीत मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ६ विकेट्स घेत बुमराहच्या उपस्थितीत टीम इंडियाचा हिरो ठरला.

mohammed siraj
IND vs ENG: वर्कलोड, ते काय असतं? बुमराह बाहेर बसला, पण सिराज इंग्लंडवर एकटा भारी पडला

Mohammed Siraj Bowling In IND vs ENG 2nd Test: भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती देण्यात…

Mohammed Siraj Takes 6 Wickets and First Fifer in England Helps India Got 180 Runs Lead
IND vs ENG: Siuuu सिराजने पटकावले ६ विकेट्स’, ४ फलंदाजांना शून्यावर केलं बाद; बुमराहच्या अनुपस्थितीत ठरला हिरो; पाहा VIDEO

Mohammed Siraj 6 Wicket Haul: भारताचा बेस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने ६ विकेट्स चटकावत इंग्लंडचा डाव गुंडाळला.

Mohammed Siraj Took 2 Wickets in Quick Succession of Joe Root Ben Stokes Watch Video IND vs ENG 2nd Test
IND vs ENG: सिराजचा इंग्लंडला दणका! २ चेंडूंत दोघांची शिकार; रूटला केलं चकित तर स्टोक्सची बाऊन्सरवर विकेट; पाहा VIDEO

Mohammed Siraj Wickets: एजबॅस्टन कसोटी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेत इंग्लंडला दोन धक्के दिले आहेत.

Yashasvi Jaiswal Drop Another Catch of Ben Duckett in 2nd Inning Mohammed Siraj Shouts in Anger Video Viral IND vs ENG
IND vs ENG: “अरे ए…” यशस्वी जैस्वाल पुन्हा सोपी कॅच केली ड्रॉप; मोहम्मद सिराज संतापून जोरात ओरडला; गौतम गंभीरने…; VIDEO

Yashasvi Jaiswal Catch Drop: भारतीय संघ दुसऱ्या डावात विकेट घेण्यासाठी मोठे प्रयत्न करत असताना यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा कॅच ड्रॉप…

ind vs eng
IND vs ENG: इंग्लंडचे फलंदाज बुमराहला घाबरले? पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

India vs England 1st Test: पहिल्या सामन्यातील पाचव्या दिवसातील शेवटच्या षटकात बुमराहचा सामना करावा लागू नये, म्हणून इंग्लंडच्या फलंदाजांनी शक्कल…

ताज्या बातम्या