scorecardresearch

एमपीएससी

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण

पूर्व परीक्षेमध्ये मागील वर्षांत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पाहू.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम

भरती प्रक्रियेचे नियोजन सुकर होण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर…

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

सन २०२२-२३ पासून आयोगाकडून राजपत्रित पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप बदलण्याबाबतच्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात आहे

MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक या…

mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कटऑफ गुण) एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात…

transgender police recruitment marathi news
एमपीएससी: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवारांसाठीचे नियम निश्चित

तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील.

revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियमामधील तरतुदी २६ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाल्या.

mpsc
मराठा आरक्षण निश्चितीनंतर परीक्षा? ‘एमपीएससी’च्या  निर्णयामुळे नाराजी

लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने फेब्रुवारीत मराठा आरक्षणाचा कायदा केला.

When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…

राज्य सेवा पूर्व परीक्षेची नियोजित २८ एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आल्याने सुधारित तारीख कधी घोषित होणार याबद्दल सातत्याने विचारणा करण्यात…

Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

सगळ्यात प्रथम तू योग्य रस्त्यावर वाटचाल करत आहेस याबद्दल अभिनंदन करतो. आपल्याला ध्येय कोणते हवे आहे? कधी हवे आहे? त्याची…

Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गातील शारीरिक चाचणी…

संबंधित बातम्या