scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.


इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.


शरद पवार हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, दिपक साळुंखे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) शिवसेना आणि इंडियन नॅशनल काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.


Read More
21 year youth arrested under pocso act for molesting 7 year old school girl
“वर्धेची जागा सोडत नाही, तुम्हीच आमच्यातर्फे लढा” राष्ट्रवादीची अमर काळेंना ऑफर; उद्या शरद पवारांसोबत भेट…

काँग्रेसचा हट्ट न धरता राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना दिला.

ncp sharad pawar and congress conflict over wardha constituency claim pmd 64 zws 70
काँग्रेस नेते म्हणतात, “वर्धेच्या मोबदल्यात दुसरी जागा द्या, पण वर्धा घ्याच,” राष्ट्रवादी म्हणते, “विदर्भात एक लढणारच…”

पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा पवार गटास द्यावी व वर्धेची जागा घ्यावी, असा पवित्रा आता स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

baramati shrinivas pawar marathi news
“…यासारखा नालायक माणूस नाही”, अजित पवार यांच्यावर सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची टीका

श्रीनिवास पवार म्हणाले, की पवार साहेबांचे वय ८३ झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. मला काही व्यक्ती…

ajit pawar thane, anand paranjape, jitendra awhad
आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला, “पवार कुटुंबाच्या नात्यावर राजकीय पोळी भाजू नका”

पवार कुटुंबाच्या नात्यावर राजकीय पोळी भाजू नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते…

amol mitkari sharad pawar
“लक्षात ठेवा, तुमच्या भ्रमाचा भोपळा…”, मिटकरींची शरद पवारांवर घणाघाती टीका; म्हणाले, “सख्ख्या भावांना एकमेकांविरोधात…”

अमोल मिटकरी म्हणाले, श्रीनिवास पवार आजपर्यंत कधीही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. ते त्यांचे व्यवसाय सांभाळत होते. परंतु, आता त्यांनी राजकीय…

jitendra awhad ajit pawar shriniwas pawar
“त्यांच्या कानाला कोण दोघं लागायचे हे…”, अजित पवारांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान!

आव्हाड म्हणाले, “शरद पवारांना सोडून जाणारे कशासाठी, कुणासाठी, का गेले, किती वर्षांपासून नियोजन करून गेले हे आम्हाला माहिती आहे!”

rohit pawar ajit pawar (2)
“अजित पवारांवर आत्ताच भाजपाचा प्रचंड दबाव, विधानसभेला तर…”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “नुकसानाच्या भितीने अनेक आमदार…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात परत येण्यास इच्छूक आहेत, असं वक्तव्य शरद पवार गटातील आमदार…

Shrinivas Pawar Speak on Ajit Pawar Splitting With Sharad Pawar Marathi News
Shrinivas Pawar: सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवार म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”

Shrinivas Pawar on Ajit Pawar श्रीनिवास पवार म्हणाले भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण भाजपासह जाण्याचा निर्णय मान्य नाही

Gadchiroli constituency, lok sabha 2024, competition, ncp and bjp, Mahayuti, Candidate Remains Unannounced, dharmarao baba atram, devendra fadnavis, ajit pawar,
राष्ट्रवादी की भाजप; महायुतीतील गडचिरोलीचा तिढा सुटेना, सोमवारी नावे जाहीर होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गडचिरोलीसाठी धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव पुढे करण्यात आले आहे, तर भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते आणि डॉ.…

sharad pawar ncp party candidate to contest from wardha constituency
वर्धा राष्ट्रवादीकडेच, प्रश्न पैशांचाच; पवारांचा पेच अन् उमेदवारांचा जीव टांगणीला…

या बैठकीत वर्धेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढणार, असा नूर दिसून आल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले म्हणाले.

chandrapur, lok sabha 2024, sharad pawar ncp group, fund, local national congress leaders, ticket, candidate, maharashtra politics, maha vikas aghadi,
“पैसे मिळणार नाही, सायंकाळी पाच वाजता सांगतो,” शरद पवार यांचा सांगावा अन् उमेदवारांची घालमेल

चंद्रपूर येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेत्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली .

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×