Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

नितीन गडकरी

नितीन गडकरी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 21 May 1957
वय 67 Years
जन्म ठिकाण नागपूर
नितीन गडकरी यांचे चरित्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.
१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Read More
नितीन गडकरी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
जयराम गडकरी
आई
भानुमती गडकरी
जोडीदार
कांचन गडकरी
मुले
निखिल गडकरी, सारंग गडकरी, केतकी गडकरी
नेट वर्थ
₹18,79,16,075

नितीन गडकरी न्यूज

Washim water issue, Nitin Gadkari letter, (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
नितीन गडकरींचे देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पत्र; जाणून घ्या नेमका विषय काय?

वाशीम जिल्ह्यामध्ये सिंचनाचा गंभीर प्रश्न आहे. सिंचन अनुशेषामुळे जिल्ह्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

आता महामार्ग व द्रुतगती मार्गांवरील वाहतूक अधिक वेगवान होणार. (PC : TIEPL)
New Toll Tax Rules : महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम

New Toll Tax Rules Private Vehicles : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने टोलबाबत नवी नियमावली जारी केली आहे.

प्रातिनिधिक फोटो लोकसत्ता
अग्रलेख : विजेला धक्का

…कारण मुळात आपल्याकडे हे क्षेत्र सवलतीवर तगले आणि वाढले. त्याची ‘हवा’च अधिक झाली, सोयी वाढल्या नाहीत आणि प्रत्यक्षात ‘सीएनजी’सारखा स्वस्त पर्यायही आहेच…

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी

ई-वाहनांचे उत्पादन वाढले आहे, बरोबरीने उत्पादन खर्चदेखील कमी होत आहे. त्यामुळे माझ्या मते अनुदान न देऊनही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील.

नितीन गडकरी यांनी दिली कबुली (संग्रहित छायाचित्र)
Nitin Gadkari on Road Accident : रस्ते अपघातात सर्वाधिक दोषी कोण? सरकार की अभियांत्रिक? नितीन गडकरी म्हणाले…

Nitin Gadkari on Road Accident : गडकरींनी वाहन उद्योगाला आवाहन केले की, सीएसआर निधी लोक आणि विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी वापरावा.

“नेत्यांच्या विश्वसनीयतेत घट”, गडकरींचा नेमका रोख कोणाकडे ? ( संग्रहित छायाचित्र )
“नेत्यांच्या विश्वसनीयतेत घट”, गडकरींचा नेमका रोख कोणाकडे ?

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन गडकरी यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नातवांनी घरीच पंचरत्न बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत विधिवत पूजा केली
नातवांनी मांडला गणपती, कौतुकाला आले गडकरी आजोबा…..एकाच घरात दोन….

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी नातवांनी घरीच गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत विधिवत पूजा केली. नातवांच्या या उपक्रमाचे आजोबांनी भरभरुन कौतुक केले.

लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे पण विश्वसनीयता कमविणे आज कठीण झाले आहे.
नागपूर : नेत्यांची विश्वसनीयता कमी होतेय, कारण लोकांना मूर्ख बनविणे…..गडकरी थेटच बोलले….

आम्ही राजकारणात असल्यामुळे सध्या वाटते की आम्ही जसे बोलतो तसे करत नाही आणि जसे बोलतो तसे वागत नाही

ई-वाहन निर्मात्यांना सरकारी अनुदान यापुढे नको - गडकरी ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
ई-वाहन निर्मात्यांना सरकारी अनुदान यापुढे नको – गडकरी

विद्युतशक्तीवरील वाहनांच्या (ईव्ही) निर्मितींना यापुढे सरकारने अनुदान देण्याची गरज नाही आणि त्यावर त्यांची मदारही असू नये, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे प्रतिपादन केले.

मालवणमध्ये उभारलेल्या पुतळ्यात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता, असे विधान नितीन गडकरी यांनी केले. (Photo - PTI)
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक

Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण पेटले. आता या प्रकरणी नितीन गडकरींनी पुतळा उभारण्यातील एक चूक लक्षात आणून दिली आहे.

सध्या अशा इंटर्नल कम्बश्चन इंजिन (आयसीई), हायब्रिड वाहनांवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. (फोटो- संग्रहित छायाचित्र)
मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांना आवाहन

मिश्र इंधन अर्थात फ्लेक्स इंधन तंत्रज्ञान पारंपरिक पेट्रोल किंवा डिझेल इंजिनमध्ये बदल करते जेणेकरून, अशी वाहने कोणत्याही यांत्रिक समस्यांशिवाय विविध प्रकारचे इंधन मिश्रण वापरू शकतात.

संबंधित बातम्या