पाकिस्तान क्रिकेट टीम Photos

टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने बहिष्काराच्या निर्णयामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टी-२० विश्वचषकातून बांगलादेशने माघार घेतल्यानंतर पाकिस्तानही स्पर्धेवर बहिष्कार टाकणार अशी चर्चा होती, पण आयसीसीच्या दंडात्मक कारवाईच्या निवेदनानंतर संघाने टी-२० वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला, ज्याचं नेतृत्त्व सलमान अली आघा करणार आहे. यानंतर पाकिस्तान टी-२० विश्वचषक खेळणार असून भारताविरूद्ध सामना खेळणार नसल्याचं पाकिस्तान सरकारने सांगितलं आहे. २००९चं जेतेपद पटकावलेल्या संघात मोहम्मद रिझवान व हारिस रौफ हे महत्त्वाचे खेळाडू नसणार आहेत, तर फॉर्मात नसलेल्या बाबर आझमला पाकिस्तानने संधी दिली आहे. भारताविरूद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान गट टप्प्यात अमेरिका, नामिबिया व नेदरलँडविरूद्ध कशी खेळते, यावर सर्वांच्या नजरा असतील. पाकिस्तानने याआधी एकदा टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.
Read More