परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
राज्यातील सत्ता बदलानंतर तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आले तरी आजही जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाचे चाचपडणेच सुरू…
भाजपचे कार्यकारिणी सदस्य असलेले संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेडला भव्य असा कार्यक्रम २६ नोव्हेंबरला पार पडला. या कार्यक्रमात मोठे शक्तिप्रदर्शन…
दिवसेंदिवस उन्हाच्या तडाख्यामुळे तापमानाचा पारा चढतच चालला असून रविवारी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. केमापूर शिवारात ही घटना…
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शुभमंगल कर्जयोजना, तसेच पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या नावे बनावट दस्तावेज तयार करून आíथक घोटाळा करणाऱ्या बँकेच्या १० कर्मचाऱ्यांना…
सहकार खात्यात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नियमित कामकाजाशिवाय निवडणुकांसारखी कामे सोपवली जातात. याचा परिणाम सहकारी संस्थांच्या गुणात्मक, संख्यात्मक वाढीवर…
राज्याच्या अर्थसंकल्पात दुष्काळी मराठवाडय़ात सिंचनासाठी ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ६९ प्रकल्पांपैकी केवळ एकाच निम्न दुधना प्रकल्पास…