scorecardresearch

शेतकरी कामगार पक्ष

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा महाराष्ट्रातील मार्क्सवादी राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९४८ साली झाली होती. पक्षाचे १० हजार सदस्य आहेत. जयंत प्रभाकर पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. पक्षाचा विधानसभामध्ये एक आमदार असून दोन आमदार विधान परिषदेत आहेत. रायगड जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव असून महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत.

पुरोगामी युवक संघटना ही शेतकरी कामगार पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. पक्षाच्या कामगार संघटनेला ऑल इंडिया वर्कर्स ट्रेड युनियन आणि ऑल इंडिया इन्शुरन्स वर्कर्स युनियन असे म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पक्षाने मोठी भूमिका बजावली होती. दाजिबा देसाई, एन डी पाटील, डी बी पाटील, दत्ता पाटील, गणपतराव पाटील यांसह इतर काही नेते पक्षाचे प्रमुख नेते आहेत.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने निवडणुकीत २४ उमेदवार उभे केले होते. परंतु केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता. श्यामसुंदर दगडोजी शिंदे हे लोहा मतदरासंघातून निवडून आले होते.
Read More
patil family loses decades long dominance in raigad zilla parishad shetkari kamgar paksha faces historic setback
रायगडच्या राजकारणातील शेकापच्या पाटील कुटूंबाची सद्दी संपली

रायगड जिल्हा परिषद हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. जिल्ह्यातील सर्व सत्ताकेंद्र पक्षाच्या ताब्यात असायची.

Zilla Parishad Panchayat Samiti elections in Uran
उरणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बंडाळीची शक्यता; युती, आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

उरणमध्ये रायगड जिल्हा परिषद व उरण पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित आहे. मात्र बुधवारी अर्ज…

Kharghar cash seizure Yash Avenue building election scam navi mumbai
खारघरमध्ये रोकडफेक उघड

पनवेल महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असताना खारघरमधील यश एव्हेन्यू इमारतीत सव्वा दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने…

Panvel Municipal Corporation election MVA Shekap seat sharing
पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे ठरले; ‘एकीचे बळ’ राखण्यासाठी शेकापचा त्याग…३३ जागांवर लढणार 

पनवेल महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत असून, महायुतीने अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री जागावाटपाचे सूत्र जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीने सोमवारी रात्री…

Panvel Municipal Corporation Election Candidate List Delay
बंडाळी टाळण्यासाठी उमेदवारीला विलंब 

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी बंडाळी रोखण्यासाठी भाजपने उमेदवार यादी जाहीर न करता थेट ‘एबी फॉर्म’…

Navi Mumbai Airport DB Patil Naming Row Project Victims Protest Agri Community
VIDEO : ‘दि. बा. पाटील’ नावावरून प्रकल्पग्रस्तांचा संताप

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण झाले असले तरी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि सामाजिक…

Panvel election voter list scam same father name multiple voters Shakap alleged moves court
धक्कादायक! मतदार यादीत एकाच वडीलांच्या नावावर २६८ मुलांच्या नावांची नोंदणी; शेकापची न्यायालयात धाव…

पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत एकाच वडिलांच्या नावावर तब्बल २६८ मुलांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेकापने थेट…

alibag municipal election result shekap Akshaya naik wins mayor
अलिबागचा बालेकिल्ला शेकापने राखला…नाईक कुटूंबाचा नगरपालिकातेतील करिष्मा कायम

भाजपच्या तनुजा पेरेकर यांचा पराभव करत त्यांनी नगरपालिकेवर चार दशकांपासून असलेले शेकापचे वर्चस्व कायम राखले आहे.

Pritam Mhatre split Shekap ahead of uran municipal Council elections
उरणमध्ये शेकापच्या विभाजनाचा भाजपला फायदा? प्रीतम म्हात्रे यांना मिळालेली मते कोणाच्या पारड्यात

उरण नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी प्रीतम म्हात्रे यांनी शेकाप फोडल्याने उरण शहरात मिळालेली २ हजार ५०० मते आणि शेकाप विभाजनाचा आणि…

Alibag BJP Shinde Sena alliance challenges Shetkari Kamgar Paksha dominance
अलिबागचा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचे शेकाप समोर आव्हान

गेल्या काही वर्षात पक्षाची झालेली वाताहत आणि जिल्ह्यात शिवसेना, भाजपचा वाढता प्रभाव यामुळे पक्ष सध्या खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे.

Panvel shetkari kamgar paksha Balaram Patil MVA Seat Sharing Determination Meet
योग्य जागा न मिळाल्यास आघाडीतून बाहेर पडा – शेकापच्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची नेत्यांसमोर मागणी

आघाडीत ताळमेळ नसल्याचा उल्लेख करत शेकाप कार्यकर्त्यांनी पनवेल मेळाव्यात सर्वाधिक उमेदवारी देण्याची मागणी करत आगामी निवडणुकीत पक्षाने ठोस भूमिका घ्यावी…

संबंधित बातम्या