scorecardresearch

प्रसाद ओक Photos

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
prasad oak and manjiri oak family photos meet their two sons and daughter in law ritu
9 Photos
हम ‘सात’ साथ है! प्रसाद ओकच्या कुटुंबात कोण-कोण असतं? होणारी सून दिसते खूपच सुंदर, ती काय करते? पाहा फोटो…

Prasad Oak Family Photos : प्रसाद ओकच्या दोन्ही मुलांना पाहिलंत का? पत्नी मंजिरीने ‘फादर्स डे’निमित्त शेअर केले सुंदर फोटो…

Prasad Oak Manjiri Oak Celebrated Adhik Maas With Actors
9 Photos
प्रसाद ओक व मंजिरी ओक यांनी अधिकमासानिमित्त दिली ३३ जोड्यांना पंगती; सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

या ३३ जोडप्यांसाठी पारंपरिक पद्धतीने आदर-सन्मान करत अत्यंत चविष्ट मेजवानीचा बेत आखण्यात आला होता.

unseen photos of chandramukhi amruta khanvilkar movie
15 Photos
Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

अमृता खानविलकरच्या वाढदिवशीच सुरु झालं होतं ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं शूटिंग, प्रसाद ओकने शेअर केलेले फोटो पाहा

marathi actor news prasad oak
9 Photos
“…म्हणून चित्रपटगृहाबाहेरील रस्त्यावर, फळीवर झोपायचो” प्रसाद ओकने सांगितला ‘तो’ प्रसंग

रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत अभिनेता प्रसाद ओकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दिग्दर्शक म्हणून देखील त्याने कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं…

actor prasad oak prasad oak new look
9 Photos
Photos : ‘धर्मवीर’मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकचा बदलता लूक

‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ चित्रपट अभिनेता प्रसाद ओकसाठी खास ठरला. या चित्रपटामुळे त्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. एरव्ही प्रसादला आपण बऱ्याचदा…

dharmveer movie release
15 Photos
Photos : ठाण्यात ‘धर्मवीर’ चित्रपटाचा खास शो; मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आनंद दिघेंच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक

‘धर्मवीर’ चित्रपटाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी आनंद दिघे यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक…

ताज्या बातम्या