scorecardresearch

रेल्वे अपघात

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
a young man was saved due to wearing helmet
VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हेल्मेट घातल्यामुळे थोडक्यात बचावला. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर…

man travels Delhi to Kanpur on roof of train
VIDEO : १०० किमीचा वेग, ११००० व्होल्टेज वायर अन्…; तरुणाने ट्रेनच्या छतावर झोपून धोकादायक स्थितीत केला प्रवास

कोणतीही हालचाल न केल्याने तरुण पॉवर लाइन संपर्कात आला नाही, त्यामुळे सुदैवाने तो थोडक्यात बचावला.

irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा

IRCTC Update : प्रत्येक ट्रेनच्या इंजिनमध्ये क्रू व्हॉईस व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टम (CVVRS) म्हणजेच एक ब्लॅक बॉक्स बसवला जाणार आहे.

Pune Station, Railway Security Force, Jawan Digambar Desai, Saves Passenger, Life, Man Falls, While Boarding Train,
धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा खेळ…जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव

तो फलाट आणि गाडीच्या मध्ये पडताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने धाव घेत या प्रवाशाला बाहेर ओढून काढत त्याचा जीव वाचविला.…

Nashik Road Railway Station, Fire broke out, Cargo Coach, Godan Express, No Casualtie,
VIDEO: नाशिक रोड स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग

लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेली गोदान एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकाजवळ आल्यानंतर गाडीच्या सर्वात मागे असलेल्या माल डब्यातून अचानक धूर निघू…

indian railways completely digital from 1 april payment can be online for parking ticket fine
ट्रेनमधून विना तिकीट प्रवास करताना पकडला गेला तर…; १ एप्रिलपासून रेल्वेच्या सुविधेत मोठा बदल

भारतीय रेल्वेच्या या नव्या बदलामुळे आता प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Person stopped at the railway gates to deliver the parcel to the motorman video
बापरे! चक्क पार्सल घेण्यासाठी मोटरमॅननं थांबवली ट्रेन; रेल्वे रुळावरचा ‘तो’ VIDEO पाहून संतापले लोक

कधी रेल्वे अपघात होतो तर कधी रेल्वेने प्रवास करताना एखाद्या व्यक्तीसोबत अपघात होतो. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ आहेत, जे…

In Ulhasnagar kneads samosa dough with feet action is taken against
समोसा खाणाऱ्यांनो सावधान! समोसा बनवण्याचे पीठ चक्क पायाने तुडवले; किळसवाणा VIDEO व्हायरल

शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशा व कचोरीचे पीठ पायाने मळण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Railway accident woman Who Fell Down While Catching A Train
VIDEO: धावती ट्रेन पकडताना तोल गेला अन् ‘ती’ फटीत पडली; मदतीसाठी ओरडत राहिली पण अखेर…

Shocking video: सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. यामध्ये धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणी ट्रेनखाली गेली आहे. या…

Man saved life of a girl who fell from running train shocking video
रेल्वे स्टेशन जवळ येताच तुम्हीही ट्रेनच्या दरवाजात उभे राहता? मग हा भयंकर VIRAL VIDEO एकदा पाहाच

Mumbai local video: अनेकदा रेल्वेच्या धडकेनं लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. यातील बहुतांश अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. अनेकदा…

Two trains collided with each other in Andhra Pradesh
आंध्र प्रदेशात झालेल्या रेल्वे अपघाताचे कारण आले समोर; रेल्वे मंत्री म्हणाले, “चालक मोबाईलवर..”

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे रायगड पॅसेंजर ट्रेनने विशाखापट्टनम पलासा ट्रेनला धडक दिली होती.

संबंधित बातम्या