Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

रेल्वे

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
RRB NTPC Recruitment 2024 notification
RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज

रेल्वे NTPC अधिसूचना 2024 नुसार, पदवीधर-स्तरीय पदांसाठी इच्छुक उमेदवार १४ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Central Railway
Central Railway : आता फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात; मध्य रेल्वेनं घेतला ‘हा’ निर्णय!

रेल्वेने प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला काही अडचण असेल किंवा त्याची काही तक्रार असेल तर थेट व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करता येणार…

Gitanjali Express Train
कल्याण: टिटवाळा येथे गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाराकडे जाणारी लोकल सेवा ठप्प

मुंबईकडून निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानक भागात बिघाड झाला.

What is the meaning of pnr indian railway ticket do you know the meaning of pnr number
रेल्वे तिकिटावरील PNR नंबर म्हणजे काय? यात दडलेली असते प्रवाशांची महत्त्वाची माहिती, जाणून घ्या

What is the meaning of PNR: जरी बहुतेक लोकांनी पीएनआर नंबरचे नाव ऐकले असेल तरी खूप कमी प्रवाशांना माहीत आहे…

Cement Blocks on Railway Tracks
Railway Tracks : रेल्वे रुळावर सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून उतरवण्याचा कट? नेमकी कुठे घडली घटना?

रेल्वे रुळांवर दोन सिमेंट ब्लॉक टाकून मालवाहू गाडी रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Vande Bharat Express Varanasi
Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेन अर्ध्या रस्त्यात बंद, मालगाडीचं इंजिन लावून ओढावी लागली; पाहा VIDEO

Vande Bharat Express Varanasi : दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस अर्ध्या रस्त्यात बंद पडली होती.

Margaon to Panvel special trains for return journey to Konkankars Mumbai news
मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या, परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना दिलासा

गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे पनवेल ते मडगाव दरम्यान…

Central Railway decision to revise the charges of coolies Mumbai
मुंबई: हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ

भारतीय रेल्वे सुरू झाल्यापासून प्रवाशांचे सामान वाहून नेण्याचे काम हमाल करत आहेत. मात्र सध्या चाकाच्या बॅगा, लिफ्ट, ट्रॉली बॅग, बैटरी…

Railway Recruitment 2024: Hiring for 11,558 vacancies, apply from September 14
Railways Recruitment 2024 : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; ११५८८ पदांवर बंपर भरती, लगेच करा अर्ज

Indian Railways Recruitment 2024 : चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. मग…

vashi railway police saved passenger marathi news
Video: वाशी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद….

प्रवाशाला दुखापत झाली असेल म्हणून त्याची विचारणा केली, मात्र मला काही झाले नाही सांगत तो निघून गेला.

Vande Bharat sleeper trains update
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये मिळणार फाइव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; किती असेल भाडं अन् सुविधा कोणत्या? घ्या जाणून…

Vande Bharat sleeper trains Updates : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही ५ स्टार हॉटेलसारखी आहे, ज्यात अंघोळीसाठी गरम…

which provides wi fi service at 6112 railway stations across the country
नागपूर : ‘नवरत्न’ म्हणजे काय? रेल्वेच्या ६,११२ स्थानकांवर ‘वाय-फाय’सेवा देणारी कंपनी कोणती?

शहरी पायाभूत सुविधांच्या विकासात आणि सुरक्षिततेला हातभार लावण्याचे काम ही कंपनी करीत आहे. या कंपनीला नवरत्न’ दर्जा प्राप्त झाला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या