Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

रविंद्र धंगेकर Photos

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. २००२ ते २०२२ पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी नगरसेवक झाले. रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरू झाला. २००२ ला रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मनसेत प्रवेश करत २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय मिळवला. एवढंच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, रवींद्र धंगेकर सध्या कसब्याचे विद्यमान आमदार आहेत. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर रवींद्र धंगेकर आवाज उठवत असल्याने ते चर्चेत असतात.


Read More